यासंदर्भात, नगरसेविका अमृता बाबर व नमेश बाबर यांनी अजित पवार यांची भेट घेतली होती. प्रशासनाच्या वतीने आपत्ती अत्यावश्यक काम होत नसून टाळाटाळ केली जात असून ओढ्यालगत असलेल्या कात्रज वसाहत येथील १५० घरे व नागरिकांना कात्रज महापुराच्या बाधित क्षेत्रात येतात.
या वेळी नगरसेवक वसंत मोरे यांनी वरखडे नगर, शेलारमळा येथील उपनाल्यावर झालेली अतिक्रमणे नाल्यातील गबलिंग काढून रुंदीकरण व खोलीकरण केल्यास नागरिकांच्या घरात पाणी जाणार नाही अशी सूचना आयुक्तासमोर मांडली.
या वेळी आयुक्त विक्रम कुमार म्हणाले की, सुरक्षा भिंतीचे काम, वसाहतीच्या सुरक्षा भिंतीची उंची वाढवणे, वरचा तलाव ते स्मशानभूमी प्रवेशद्वार ओढ्यातील पाणी प्रवाहास अडथळा ठरतील अशी वळणे काढणे, तसेच पाच फूट खोली करणे, पुलाखालून जाणारी १२०० मिमी व्यासाची पाण्याची मुख्य लाईन बदलणे अशा कामाचे तत्काळ आदेश देण्यात आले आहे.
या वेळी आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार, नगरसेवक वसंत मोरे, अधीक्षक अभियंता जगदीश खानोरे, उपअभियंता प्रकाश पवार, नमेश बाबर, स्वप्निल मोरे उपस्थित होते.