गुळाणी येथे सटवाजीबुवा मंदिर परिसरात देवस्थान ट्रस्टीने कुठलीही परवानगी न घेता मुरूम व मातीचा उपसा केला होता. याबाबत खेड तहसीलदार यांच्याकडे संदीप पिंगळे यांनी तक्रार केली होती. महसूल प्रशासनाने यांनी पाहणी करून ट्रस्टीतील विश्वस्तांना ४ लाख १९ हजार रुपये दंड केला होता. आम्ही सर्व परवानगी काढून या उत्खननाची रॉयल्टी ठेकेदाराने भरली आहे, असे भासवून हा दंड भरण्यास विश्वस्त टाळटाळ करीत होते. याबाबत संदीप कुंडलिक पिंगळे, ज्ञानेश्वर शांताराम रोडे, कान्हू रामभाऊ ढेरंगे व ग्रामस्थांनी खेड तहसीलदार यांनी केलेल्या दंडाच्या आदेशाला अनुसरून धर्मादाय आयुक्त पुणे यांच्या न्यायालयात सटवाजीबुवा मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दिलीप ढेरंगे, सचिव सुधीर पिंगळे, खजिनदार रामदास रोडे, व इतर १६ कार्यकारी विश्वस्तांविरुद्ध धर्मादाय आयुक्तांकडे तक्रारी अर्ज केला होता. अर्जदारांचे म्हणणे व पुरावा ग्राह धरून संबंधित विश्वस्तावर उत्खनन व त्यांची विल्हेवाट लावली, याप्रकरणी कुठलीही पूर्व परवानगी न घेता अवैधरीत्या गौन उत्खनन केल्याप्रकरणी देवस्थान ट्रस्टीतील कार्यकारी विश्वस्तांना जबाबदार धरले आहे. तसेच दंड रक्कम ४ लाख १९ हजार रुपये कार्यकारी विश्वस्तांनी वैयक्तिकरीत्या भरण्याचे आदेश धर्मदाय आयुक्तांनी दिले आहेत.
फोटो: गुळाणी येथील सटवाजीबुवा मंदिर.