लोकमत न्यूज नेटवर्कभिगवण : जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून तक्रारवाडी येथे सुरू असलेले खासगी रस्त्याचे काम तातडीने बंद करण्याचे आदेश जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वासराव देवकाते यांनी दिले आहेत. तसेच याची पूर्णपणे चौकशी होईपर्यंत परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवण्याचेही आदेश दिले आहेत.तक्रारवाडी गावच्या डोंगरमाथ्यावर मंदिराचे नाव पुढे करीत खासगी शेतात जाण्यासाठी रस्ता तयार करण्याचा घाट घातला जात होता. याबाबत ‘लोकमत’मध्ये बुधवारी (दि. २४) वृत्त प्रसिद्ध झाले होते. ‘लोकमत’मधील वृत्ताची दखल घेऊन जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वासराव देवकाते यांनी तातडीने या रस्त्याचे काम थांबवण्याचे आदेश दिले. या गैरकामला विरोध करीत तक्रारदार नितीन काळंगे आणि ग्रामस्थांनी याविषयी सबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. परंतु राजकीय दबाव आणि काही इतर तडजोडीमुळे अधिकारी मनमानीपणा करीत सबंधित काम रेटून नेण्याचा प्रयत्न करीत होते. याविषयी ‘लोकमत’ने ‘जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून खासगी शेतीसाठी रस्ता’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली होती.
खासगी रस्त्याचे काम थांबवण्याचे आदेश
By admin | Published: May 27, 2017 1:21 AM