सांगवी : पणदरे (ता. बारामती)चे ग्रामविकास अधिकारी संजय साळुंके यांना अखेर निलंबित करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी दिले आहेत. या कारवाईनंतर विक्रम कोकरे यांनी पंचायत समितीसमोर सुरू केलेले अमरण उपोषण रविवारी (दि. १९) मागे घेतले.विक्रम कोकरे यांनी पणदरे ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचाराबाबत ग्रामविकास अधिकाºयाविरोधात कारवाई होण्यासाठी गेले पाच दिवस पंचायत समितीसमोर आमरण उपोषण केले होते. जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते, जिल्हा परिषद सदस्य भरत खैरे यांनी भेट दिली. विक्रम कोकरे यांच्या आमरण उपोषणाची दखल घेऊन ग्रामविकास अधिकाºयाला निलंबित करण्याचे आदेश जिल्हा परिषदेकडून देण्यात आले. नियमाच्या बाहेर जाऊन पणदरे ग्रामपंचायतीला कर्मचारी कमी करून नवीन कामगार नियुक्त करणे, शववाहतूक गाडीत गैरव्यवहार करणे, नळ डिपोझीट नियमाप्रमाणे ताळमेळ न घेणे, गैरव्यवहार, भ्रष्टाचार, अफरातफर यात तफावत आढळून आल्याने ववरील कामात हलगर्जीपणा केल्याने साळुंके यांनानिलंबित करण्यात आले आहे.ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावीपणदरे ग्रामपंचायतीमध्ये अजूनही खूप भ्रष्टाचार उघडकीस यायचा बाकी असून माझी वारंवार बदनामी केल्या प्रकरणी साळुंके अब्रुनुकसानीचा दावा टाकणार असून ग्रामसेवक व संबंधित प्रशासन यांच्यावर वसूल पात्र व फौजदारी गुन्हे दाखल होऊन, राज्यपाल शासन परिपत्रक ४ जानेवरी २०१७ प्रमाणे ग्रामविकास अधिकाºयाला वाचवण्याचा प्रयत्न करून विलंब केल्याने गटविकास अधिकारी यांच्यावर शिस्तभंग व निलंबन होईपर्यंत आता गप्प बसणार नाही.बारामती तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमधील भ्रष्टाचार उघडकीस आणणार आहे. यासाठी कोणाच्या दबावाला बळी न पडता ज्येष्ठ सामाजसेवक अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांना न्याय मिळवून देणार असल्याचे कोकरे यांनी सांगितले.गटविकास अधिकारी प्रमोद काळे व तहसीलदार हनुमंत पाटील यांच्या दबावाला बळी पडून मला कोणत्याही सूचना न देता उपजिल्हा रुग्णालयात डॉ. उमेश नाईक यांनी पोलिसांच्या मदतीने बळजबरीने आणले. नाईक यांनी खोटा वैद्यकीय अहवाल देऊन लोकशाहीचा घात केला आहे. यामुळे डॉ. नाईक यांचे निलंबन करण्यात यावे, तसेच गटविकास अधिकारी, तहसीलदार यांच्याविरोधात विभागीय आयुक्तांकडे आरोपपत्र दाखल करणार आहे. - विक्रम कोकरे, सामाजिक कार्यकर्ते
ग्रामविकास अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 1:49 AM