शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषद, महामंडळ देतो; अर्ज मागे घ्या... मविआत बंडोबांना थंड करण्याचे प्रयत्न!
2
रशियानं गुगलला ठोठावला असा दंड की तुम्हीही चक्रावून जाल, एवढा पैसं संपूर्ण पृथ्वीवरही नाही! काय आहे प्रकरण? 
3
बंडखोर ऐकेनात, मनधरणीसाठी महायुतीच्या नेत्यांचा कस; माघारीसाठी काय रणनीती?
4
अयोध्येत २५ लाख दीपोत्सवाचा विश्वविक्रम... १,१२१ जणांनी एकाच वेळी केली आरती 
5
आजचे राशीभविष्य, ३१ ऑक्टोबर २०२४: आर्थिक लाभ संभवतात, कौटुंबिक वातावरण आनंदी असेल!
6
सोने लक्ष्मीपूजनापूर्वीच प्रथमच गेले ८० हजारांवर; चांदीनेही खाल्ला भाव
7
"डाेनाल्ड ट्रम्प अस्थिर, प्रतिशोधाने पछाडलेले...", शेवटच्या भाषणात कमला हॅरिस यांचा हल्लाबोल
8
शरद पवार हे घरे फोडण्याचे जनक : देवेंद्र फडणवीस
9
इस्रायलचा हल्ला, गाझात ८८ जण ठार; अन्न, पाण्यासह औषधांचीही चणचण
10
स्वदेशी संस्थांनी केली ४.६ लाख कोटींची गुंतवणूक, शेअर बाजारात सार्वकालिक उच्चांक
11
पोलिसांनी एसी, कॉम्प्युटर, टीव्ही फुकट घेतले; पैसे मागितल्यानंतर वापरलेल्या वस्तू केल्या परत 
12
दोन ठिकाणांवरील भारत, चीन सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण
13
भाजप बंडखोर उमेदवार विशाल परब यांच्या गाडीवर हल्ला 
14
डिजिटल ट्विन - तुम(चेच विचार, तुमचाच आवाज, डिट्टो तुम्हीच!
15
‘संविधानदिनी’ १४१ कच्च्या कैद्यांची सुटका?
16
कार्यकर्त्याला आमदार होण्याची स्वप्ने, त्याचाच परिणाम गुणवत्ता नसलेल्या भारंभार उमेदवारांची गर्दी
17
जागा मिळविण्यात काँग्रेस, भाजप आघाडीवर; दोन ठिकाणी तिढा
18
मतदान करायचेय, आधी थोडं फिरून येऊ! सुट्ट्यांमुळे ‘एमटीडीसी’चे रिसाॅर्ट १५ नोव्हेंबरपर्यंत फुल
19
मुंबईत ३६ मतदारसंघांत दाखल झालेल्या ६२५ उमेदवारी अर्जांपैकी ४७२ अर्ज ठरले वैध
20
त्यांना दिवसातून तीनदा मीच का दिसतो? फडणवीसांचा सवाल; जरांगे पाटलांनीही दिलं प्रत्युत्तर!

सिरीयातून आदेश, पुण्यात आयसिसचा बॉम्बस्फोटांचा कट, चौकशीदरम्यान धक्कादायक माहिती उघड

By नम्रता फडणीस | Published: November 07, 2023 7:21 PM

दहशतवादी मोहम्मद शाहनवाज आलम याने चौकशीदरम्यान केली धक्कादायक माहिती उघड...

पुणे : दहशतवादी विचारधारेचा प्रसार, तसेच तरुणांची माथी भडकावून त्यांना दहशतवादी कारवायांमध्ये ओढणाऱ्या आयसिसच्या महाराष्ट्र गटाकडून पुण्यात साखळी बाॅम्बस्फोट घडविण्याचा कट दहशतवाद्यांनी रचला होता. आयसिसच्या महाराष्ट्र गटातील दहशतवाद्यांना सिरीयातून याबाबतच्या सूचना मिळाल्याची धक्कादायक बाब तपासात समोर आली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) ताब्यात घेतलेला दहशतवादी मोहम्मद शाहनवाज आलम याने एनआयएच्या अधिकाऱ्यांना चौकशीदरम्यान ही माहिती दिल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

एनआयएने सहा दिवसांपूर्वी कोढव्यातून पसार झालेला दहशतवादी मोहम्मद शाहनवाज आलम उर्फ शफिकूर रहमान आलम (रा. हजारीबाग, झारखंड) याला नुकतीच अटक केली. आलमला एनआयएच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. आलमची एनआयच्या पथकाने चौकशी केली. तेव्हा पुण्यात साखळी बाँम्बस्फोट करण्याचा कट रचला होता. याबाबत सिरीयातून सूचना मिळाल्याची माहिती त्याने एनआयएच्या अधिकाऱ्यांना चौकशीत दिली. याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या सात दहशतवाद्यांकडून राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) मुंबईतील विशेष न्यायालयात नुकतेच आरोपपत्र दाखल केले.

जुलै महिन्यात पुण्यातील कोथरुड भागात दुचाकी चोरताना इम्रान खान, मोहम्मद साकी, मोहम्मद आलम यांना अटक करण्यात आली होती. कोंढव्यात आरोपी साकी, खान, आलम वास्तव्यास होते. त्यांच्या घराची झडती घेण्यात आली. तपासात तिघे दहशतवादी आयसिसच्या संपर्कात असल्याचे उघडकीस आले होते. महाराष्ट्र, गोवा, तेलंगणात आयसिसच्या विचारधारेचा प्रसार करण्याचे काम त्यांच्याकडे साेपविण्यात आले होते. दहशतवाद्याकडून पिस्तूल, स्फोटके सापडले होते. दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण देण्यासाठी कोंढव्यात प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. बाँम्बस्फोट घडविल्यानंतर अटक टाळण्यासाठी त्यांनी दुर्गम भागात लपण्याची जागा शोधली होती. पुण्यातील महत्वाच्या लष्करी संस्थांच्या परिसराचे त्यांनी ड्रोन कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण केले होते, असे एनआयएने दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे.

यामध्ये मोहम्मद इम्रान मोहम्मद युसुफ खान उर्फ मटका उर्फ अमीर अब्दुल हमीद खान, मोहम्मद युनुस मोहम्मद याकुब साकी उर्फ आदिल उर्फ आदिल सलीम खान (दोघे रा. रतलाम, मध्यप्रदेश), कादीर दस्तगीर पठाण उर्फ अब्दुल कादीर (रा. कोंढवा), समीब नासीरउद्दीन काझी (रा. कोंढवा), जुल्फीकार अली बडोदावाला उर्फ लालाभाई उर्फ सईफ, शामिल साकीब नाचन, अकिफ आतिफ नाचन (तिघे रा. पडघा, जि. ठाणे ) या दहशतवाद्यांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे . त्यांच्याविरुद्ध बेकायदा हालचाली प्रतिबंधक कायदा (यूएपीए), स्फोटके तयार करणे, बाळगणे (एक्सप्लोझिव्ह सबस्टन्स ॲक्ट), तसेच विविध कायद्यांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड