गराडे: सोई-सुविधांच्या उपलब्धतेसाठी जागरूक नागरिकांनी पाठपुरावा करणे गरजेचे आहे. पायाभूत सुविधांमुळे लोकांचे जीवनमान उंचावते. त्यामुळे सर्वसामान्य लोकांची कामे प्राधान्याने झाली पाहिजेत, असे प्रतिपादन पुणे जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय झुरंगे यांनी केले.
भिवरी (ता. पुरंदर) येथे खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार संजय जगताप यांच्या माध्यमातून ६० लाख रुपये खर्चाच्या कामांचा भूमिपूजन समारंभ झुरंगे यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेस सरचिटणीस गणेश जगताप होते.
या वेळी पुरंदर पं. स. उपसभापती दत्तात्रय काळे, पंचायत समिती सदस्या सुनीता कोलते, नीरा बाजार समिती माजी उपसभापती ईश्वर बागमार, काँग्रेस नेते विठ्ठल मोकाशी, धर्माजी गायकवाड, संदीप फडतरे, साहेबराव फडतरे, सरपंच संजय कटके, उपसरपंच प्रणोती कटके, ग्रा.पं. सदस्य मारुती कटके, हरिदास गायकवाड, कौशल्या दळवी, साधना ताम्हाणे, चेअरमन पोपट कटके, सखाराम कटके, प्रकाश कटके, माजी सरपंच शहाजी लोणकर, माजी उपसरपंच जगन्नाथ देवराम कटके, भाऊसाहेब कटके, उद्योगपती सोपानराव कुंजीर ,विशाल कटके, शंकरनाना कटके , दत्तात्रय ताम्हाणे , सोमनाथ घिसरे , गणेश घाटे , हनुमंत साळुंके आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन भाऊसाहेब दळवी, हनुमंत कामठे, म्हस्कू दळवी, गणेश दळवी, हरिदास दळवी, रामदास सावंत, सीताराम कटके, सुहास कटके ,शिवाजी घारे,राजेंद्र ताम्हाणे व भिवरीकर ग्रामस्थ यांनी केले.
आमदार संजय जगताप यांचे विशेष आभार भाऊसाहेब दळवी व प्रकाश कटके यांनी व्यक्त केले.
प्रास्तविक हनुमंत कामठे यांनी केले. सुत्रसंचालन माऊली घारे यांनी केले, तर राहुल कटके यांनी आभार मानले.
भिवरी (ता. पुरंदर) येथे विकासकामांचे भूमिपूजन करीत असताना दत्तात्रय झुरंगे शेजारी गणेश जगताप, सुनीता कोलते व इतर.