सह्याद्रि हॉस्पिटल्स मधील यकृत व मल्टिऑर्गन ट्रान्सप्लांट विभागाचे संचालक डॉ. बिपीन विभूते म्हणाले की यकृताच्या अंतिम टप्प्यातील आजार असलेल्या छत्तीसगड येथील ५५ वर्षीय व्यक्तीवर यकृत प्रत्यारोपण तर टाइप १ मधुमेह आणि डायलिसिससह मूत्रपिंडाच्या दीर्घकालीन आजार असलेल्या सज्जनगड सातारा येथील एका ४० वर्षीय व्यक्तीवर मूत्रपिंड-स्वादुपिंड प्रत्यारोपण करण्यात आले.प्रत्यारोपणाची प्रक्रिया ही अधिकाधिक खबरदारी व किमान कर्मचाऱ्यांसह कोविड-१९ संदर्भात सर्व मार्गदर्शक सुचनांचे पालन करत करण्यात आली.दोन्ही रुग्ण आता स्थिर आहेत .
प्रत्यारोपण टीममध्ये हेपॅटोबिलियरी व यकृत प्रत्यारोपण शल्यविशारद डॉ.बिपीन विभूते,डॉ.दिनेश झिरपे ,डॉ.अनिरूध्द भोसले, हेपॅटॉलॉजिस्ट डॉ.शीतल महाजनी, पेडिअट्रिक हेपॅटॉलॉजिस्ट डॉ.स्नेहवर्धन पांडे, नेफ्रॉलॉजिस्ट डॉ.मनन दोशी आणि डॉ.सचिन पाटील, जीआय सर्जन डॉ.सचिन वझे, प्रत्यारोपण भूलतज्ञ डॉ.मनिष पाठक, डॉ.किरण थत्ते व डॉ.मनोज राऊत, यांचा समावेश होता