बारामती : शंभर टक्के सेंद्रिय राज्य बनलेल्या सिक्कीम राज्याचा संपूर्णपणे अभ्यास करण्यात येणार आहे. सिक्कीम पॅटर्नच्या पार्श्वभूमीवर राज्यातही सेंद्रिय शेतीची स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात येईल. शासनाची सर्टिफाईड यंत्रणा करण्यासाठी वेगाने प्रयत्न केले जातील. जागतिक बँकेच्या मदतीने स्मार्ट शेती योजनेतून भाजीपाला व फळपिकासाठी विशेष कार्यक्रम राबविला जाईल, असे राज्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी सांगितले.बारामतीसह अन्य परिसरातील अन्य शेतकºयांनी उभारलेल्या महा आॅरगॅनिक अँड रेसिड्यू फ्री फार्मर्स असोसिएशनच्या हडपसर येथील मेगा सेंटरमधील कार्यालयाचे उद्घाटन दिवसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. दिवसे म्हणाले, सेंद्रिय शेतीसाठी राज्यात स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यात येईल. तसेच,तांत्रिक दृष्टीने परिपूर्ण सेंद्रिय व विषमुक्त शेती करण्यासाठी लागणारी संपूर्ण मदत करून शेतकºयांनी पिकविलेला विषमुक्त माल ‘मार्केट लिंक ’करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. त्यासाठी शेतकºयांना सर्वतोपरी मदत करणार आहे. यावेळी पुणे जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन सभापती सुजाता पवार, सातारा जिल्हा कृषी अधीक्षक सुनील बोरकर, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक अनिल देशमुख, डॉ. बाळासाहेब हरपळे, सुदाम इंगळे आदी उपस्थित होते.‘मोर्फा’चे अध्यक्ष अंकुश पडवळे यांनी प्रास्ताविकात सांगितले की, ‘ सेंद्रिय व विषमुक्त शेती करणाºया शेतकºयांना तांत्रिक मार्गदर्शन व सेंद्रिय उत्पादकांना मार्केट लिंक करणे, तसेच प्रश्न शासनापुढे मांडणेसाठी ‘मोर्फा ’ची स्थापना केली आहे. सेंद्रिय शेती करणाºयांना सेंद्रिय शेतीमाल विक्रीसाठी शासनाने सर्वतोपरी मदत करावी, सेंद्रिय शेती अभियान राज्यभर राबवावे,पुढील काळात थर्ड पार्टी आॅरगॅनिक सर्टिफिकेशन साठी शासनाने मदत करावी. कार्यक्रमात विभागीय कृषी सहसंचालक दिलीप झेंडे व माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी उमेश मगर, नंदा भुजबळ, नवनाथ गरुड, सागर पाटील, हेमंत सोमवंशी, सतीश देशमुख, मिलिंद चव्हाण, ऋषिकेश गायकवाड, आकाश बांगर, अजिंक्य चव्हाण, रणजित जगताप, नीलकंठ जाधव आदी उपस्थित होते. आभार मोर्फाचे सचिव प्रल्हाद वरे यांनी मानले.
राज्यात सेंद्रिय शेतीचा ‘सिक्कीम पॅटर्न’ राबविणार : कृषी आयुक्त सुहास दिवसे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2019 1:00 PM
सिक्कीम पॅटर्नच्या पार्श्वभूमीवर राज्यातही सेंद्रिय शेतीची स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात येईल.
ठळक मुद्दे जागतिक बँकेच्या मदतीने भाजीपाला व फळपिकासाठी कार्यक्रम