बारामती : सेंद्रिय शेतीतील समस्यांबाबत सेंद्रिय उत्पादक शेतकऱ्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. या वेळी पवार यांनी याबाबत लवकरच कृषिमंत्र्यांसमवेत बैठक घेत तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
बारामती येथे ‘मोर्फा’ या सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संघटना व ‘ओमा’ ही सेंद्रिय कृषिनिविष्ठा उत्पादकांची संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नेते पवार यांच्या गोविंदबाग येथील निवासस्थानी भेट घेतली. सेंद्रिय शेतीतील समस्या, तसेच केंद्र सरकारने बायोस्टिमुलंट उत्पादनासंदर्भात केलेल्या नवीन कायद्यातील लघुउद्योजकांना अडचणीच्या ठरणाऱ्या अटींबाबत निवेदन देण्यात आले. त्यावर पवार यांनी राज्य सरकारच्या वतीने उत्पादकांना लागणारे ‘जीटू’ हे शिफारस पत्र लवकरात लवकर मिळण्याच्या दृष्टीने राज्यातील कृषिमंत्री, अधिकारी व उत्पादकांची लवकरच बैठक बोलावण्याची सूचना केली.
सदर भेटीत ‘मोर्फा’चे अध्यक्ष अंकुश पडवळे, सचिव, प्रल्हाद वरे, उपाध्यक्ष, स्वाती शिंगाडे, संचालक अमरजित जगताप, अरविंद खर्चे, प्रभाकर राऊत, सुनील टिळेकर व नितीन कापसे सहभागी होते.
————————————————
फोटो ओळी : शेती समस्यांबाबत सेंद्रिय उत्पादक
शेतकऱ्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची बारामती येथे भेट घेतली.
१९०६२०२१-बारामती-०८
१९०६२०२१-बारामती-०९
————————————————