शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

कोरेगाव बाजारने घेतला वृद्ध महिलेचा जीव

By admin | Published: May 20, 2017 5:03 AM

पुणे-नगर महामार्गावर वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या कोरेगाव भीमा येथील आठवडे बाजारमुळे होणारी वाहतूक कोंडी सुटता सुटत नाही. आजपर्यंत प्रवाशांना वाहतूक कोंडीच्या

- लोकमत न्यूज नेटवर्क

कोरेगाव भीमा : पुणे-नगर महामार्गावर वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या कोरेगाव भीमा येथील आठवडे बाजारमुळे होणारी वाहतूक कोंडी सुटता सुटत नाही. आजपर्यंत प्रवाशांना वाहतूक कोंडीच्या त्रासाला सामोरे जावे लागत असताना आठवडे बाजारात शेतातील माल विकण्यासाठी आलेल्या वृध्द महिलेस रस्ता ओलांडत असताना बसची धडक बसल्याने महिला ठार झाली आहे. कोरेगाव भीमा येथील आठवडे बाजारमुळे पुणे-नगर महामार्गावर मोठ्याप्रमाणावर वाहतूक कोंडी होत असते. बाजारमुळे होणारी वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी गेल्या दीड वर्षांपासुन जिल्हाधिकारी सौरभ राव स्थानिक अधिकाऱ्यांच्या बैठका घेवून सतत बाजार स्थलांतरित करन्याबाबत आदेश देवूनही तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलीस निरिक्षक बाजारची पाहणी करण्यापलीकडे कोणतीच कार्यवाही करताना दिसत नसल्याने वाहतूक कोंडी सुटता नाही उलट वाहतूक कोंडीत वाढच होत आहे. आठवडे बाजार दिवशी होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे अनेकवेळा रुग्नवाहिकेतून उपचारासाठी जाणाऱ्या रुग्नांच्या रुग्नवाहीकेंना रस्ता मिळत अनेकांना उपचाराअभावी आपला जिव गमवावा लागत आहे. त्यात भर म्हणून की काय वढु चौक व गणेश भुवन चौकामध्ये रस्ता बॅरीगेट व दोरी बांधुन बंद करण्यात येत असल्याने पादचाऱ्यांना रस्ता दुभाजकावरुन रस्ता ओलांडावा लागत असल्याने नागरिक, वृध्दांच्या अंगावर वाहने येण्याचेही प्रकार घडत असतात.शिक्रापुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तायकीशा इंजीनीअरींग इंडिया लीमीटेड या कारखान्याची कामगारांना घेवून जाणारी बस क्र. एम. एच. १२ एच. बी. १९९७ हि नगर बाजुकडुन पुन्याकडे जात ासताना कोरेगाव भीमा येथिल वाहतूक कोंडीत अडकली होती. थोडा रस्ता मोकळा झाल्यानंतर बस जोरात चालली होती. त्याचवेळी अंजना गणपत भंडारे (वय ६५, रा. वढु बुद्रुक) ही वृध्द महिला शेतातील माल बाजारमध्ये विकून घरी जात असताना तायकीशा कारखान्याच्या बसची धडक बसल्याने महिला खाली पडली. महिला खाली पडल्यानंतर बसच्या बरोबर मध्ये आल्याने गंभीर जखमी झाली होती. डोक्याला, छातीला जास्त मार लागला असल्याने वाघोली येथिल आयमॅक्स रुग्नालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान महिलेचा मृत्यू झाला असुन बसचा चालक फरार झाला आहे. तर पुढील तपास जगदाळे हे करित आहे. पादचाऱ्यांना मार्गिका तयार कराआठवडे बाजार दिवशी वाहतूक कोंडी सोडविण्याचा स्वत:वरील ताण कमी करण्यासाठी वढू चौक व गणेश भुवन येथिल रस्ता बॅरिगेटने बंद करण्यात येत असल्याने पादचाऱ्यांना रस्ता दुभाजकावरुन रस्ता ओलांडावा लागत असल्याने वृध्द महिलेला जीव गमवावा लागला आहे. यातुन बोध घेत शिक्रापुर पोलीसांनी पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी मार्गिका तयार करण्याची मागणी ग्रामस्थ करित आहे.