शिबिराचे उद्घाटन घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र गावडे यांच्या हस्ते झाले. या वेळी घोडगंगाचे उपाध्यक्ष ॲड. रंगनाथ थोरात, टाकळीचे माजी उपसरपंच तुकाराम उचाळे, बापूसाहेब गावडे विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. बी. गावडे, प्रभाकर खोमणे, धोंडीभाऊ जाधव, सुभाष गावडे, बाबाजी साबळे, सोनभाऊ मुसळे, राहुल सोदक, संतोष गावडे, अक्षय पाराठे, संदीप गावडे, शिवाजी चाटे, शहाजी सोदक, गुरुनाथ भाकरे, कुंडलिक उचाळे, संदीप घोडे, स्वप्निल गावडे, विजय थोरात, शरद घोडे उपस्थित होते.
अजित गावडे म्हणाले, तरुणांच्या सहकार्यामुळे रक्तदान शिबिर आयोजित करत आहे. रक्तदान हेच श्रेष्ठदान असून कोरोना काळात अनेकांना रक्त व प्लाझ्मा मिळत नाही. त्यामुळे हे शिबिर महत्त्वपूर्ण ठरेल. यापुर्वी जिल्हा परिषद सदस्य सोनभाऊ गावडे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त व खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्ताने अशा ७ वेळा रक्तदान शिबिरांचे आयोजन केले होते. हे शिबिर यशस्वी होण्यासाठी उद्योजक पंकज साबळे, राहुल सोदक, अक्षय पाराठे, संतोष गावडे यांनी सहकार्य केले. तर शिबिराचे नगर येथील अपर्ना रक्तपेढीच्या डॉ. भाग्यश्री पवार, गणेश मोकाशी, अशोक मुंडे, रविना देवकर यांनी नियोजन केले.
२१ टाकळी हाजी