यावेळी प्रेरणा संस्थेतर्फे कै.कॅप्टन शंकर कृष्ण जोशी यांच्या स्मरणार्थ युवा पुरस्कार देण्यात येणार असून, गुरू सुरेश तळवलकर यांचे शिष्य जगमित्र रामलिंग लिंगाडे, वेदांग वीरेंद्र जोशी, भार्गव व्यंकटेश देशमुख आणि गंधार शिंदे, प्रमोद मराठेयांचे शिष्य ऋषीकेश पूजारी, शौनक अभिषेकी यांचे शिष्य विश्वजीत मेस्त्री यांना पंडित रघुनंदन पणशीकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे, यावेळी पंडित रघुनंदन पणशीकर, गायिका विदुषी सानिया पाटणकर यांच्या गायनासह राजस उपाध्ये यांचे एकल व्हायोलिन वादन होणार आहे. या कसदार सादरीकरणा बरोबरच या सांगितिक प्रवासात ख्याल, ठुमरी, दादरा, सरगम गीत, टप्पा, बहुभाषिक लोकसंगीत, भावगीत, गझल, नाट्यगीत, भजन असे संगीताचे विविध प्रकार सादर होणार आहेत. मंजुश्री गाडगीळ निवेदन करणार आहेत.