ओबीसींचे राजकीय आरक्षण व पदोन्नतीतील आरक्षण रद्द झाल्याने २९ जुलैला बारामती येथे महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, यासाठी दौंड तालुक्यात ओबीसी जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे.
चौफुला येथील बोरमलनाथ मंदिरात ओबीसी जनजागृती अभियान तयारीसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी तालुक्यात गावोगावी बैठका घेऊन या विषयाचे गांभीर्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार केला आहे. दौंड तालुक्यात १५ जुलैपासून गावोगावी बैठका सुरू होतील. या बैठकीला दौलत ठोंबरे, दादासाहेब केसकर, बाळासाहेब तोंडेपाटील, हरीश खोमणे, उद्धव फुले, पोपट मेरगळ, भानुदास नेवसे, अशोक हंडाळ, कैलास महानोर, झुंबर गायकवाड, सुभाष कुदळे, बापू भागवत, इम्रान तांबोळी, आश्लेषा शेलार, संभाजी खडके, तात्या ताम्हाणे, उमेश म्हेत्रे, सचिन रंधवे, श्रीकांत हंडाळ आदी उपस्थित होते.