शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

वृक्षारोपण, रोपांचे वाटप, जनजागृती रॅलीचे आयोजन

By admin | Published: June 06, 2016 12:48 AM

जागतिक पर्यावरणदिनानिमित्त शहरात राजकीय व सामाजिक संस्थांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते

पुणे : जागतिक पर्यावरणदिनानिमित्त शहरात राजकीय व सामाजिक संस्थांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.पर्यावरण दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा व स्थानिक नागरिक यांच्या संयुक्त विद्यमाने आनंदवन कोंढवा येथे प्लॅस्टिकमुक्त परिसर अभियान राबविण्यात आले. परिसारातील प्लॅस्टिक बाटल्या, कॅरीबॅग, दुधाच्या पिशव्या व अन्य प्लॅस्टिक कचरा गोळा करण्यात आला. या वेळी नागरिकांना प्लॅस्टिकचा वापर कमी करावा, असे आवाहन करण्यात आले. याप्रसंगी इसाक पानसरे, हुजूरभाई इनामदार, अभिजित पोमण, सुवर्णा पोमण, मुबारक शेख इ. मान्यवर उपस्थित होते.पर्यावरण दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने रोप आपल्या दारी या उपक्र माचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाअंतर्गत मागेल त्याला रोप त्याच्या दारी देण्यात येणार आहे. ५ जून ते १५ आॅगस्ट या कालावधीत हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. त्याचबरोबर मनसे गटनेत्यांमार्फत प्रत्येक नगरसेवकाला प्रभागात वृक्षारोपणाचे कार्यक्रम देण्यात आले आहेत.राष्ट्रवादी युवक काँग्रेस व वैभव पंचमुख मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने, पर्यावरण दिनानिमित्त खराडी-चंदननगर परिसरातील नागरिकांना घरोघरी विविध जातींच्या रोपांचे वाटप करण्यात आले, तसेच विविध ठिकाणी वृक्षारोपण करून त्या वृक्षांचे संवर्धन करण्याची शपथ या वेळी नागरिक व कार्यकर्त्यांनी घेतली.या वेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष वैभव पंचमुख, संतोष व्हालकर, अमोल पवार, लकी वसवे, शशी कांबळे, योगेश चौधरी, नाना धुमाळ, फिरोज खान, सुयोग कर्डिले, दादा धुमाळ इ. पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.वृक्षारोपण करताना त्या भागात जे वृक्ष टिकतील, वाढतील असेच स्थानानुरुप वृक्षारोपण करणे गरजेचे असल्याचे मत खासदार अनिल शिरोळे यांनी पर्यावरण दिनानिमित्त शनिवार पेठेत आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात व्यक्त केले. या कार्यक्रमाला नगरसेविका मुक्ता टिळक, नगरसेवक दिलीप काळोखे, सचिन सप्रे, रवी मावडीकर व स्थानिक नागरिक उपस्थित होते.जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पुणे शहर महिला काँगे्रसच्या वतीने मुठा नदीचे जलपूजन व नदी स्वच्छता कार्यक्रम आयोजिण्यात आला होता. शहर महिला काँगे्रसच्या अध्यक्षा मंदाताई चव्हाण व अखिल भारतीय महिला काँगे्रसच्या सरचिटणीस कमल व्यवहारे यांच्या हस्ते मुठा नदीचे हळदी-कुंकू व फुले वाहून जलपूजन करण्यात आले. तसेच नदीपात्राची स्वच्छता करण्यात आली. सर्व महिलांनी पर्यावरण संतुलन राखण्यासाठी स्वच्छतेची शपथसुद्धा या वेळी घेतली.जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पुणे शहर जिल्हा काँगे्रस कमिटीच्या वतीने सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले होते. कॅम्पातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ््यास शहराध्यक्ष रमेश बागवे, अ‍ॅड. अभय छाजेड व सुधीर जानजोत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सायकल फेरीला सुरुवात करण्यात आली.सायकल फेरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ््यापासून सुरू झाली व काँगे्रस भवन येथे समाप्त झाली. ‘झाडे लावा झाडे जगवा,’ ‘जल है तो कल है,’ प्रदूषण टाळा सायकल चालवा, पाणी अडवा पाणी जिरवा अशा घोषणा या वेळी देण्यात आल्या.