लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुण्यामध्ये सलग तिसऱ्या वर्षी सोलारीस करंडक वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या १५ ते १९ दरम्यान होणारी ही स्पर्धा सोलारीस क्लब, मयूर कॉलनी येथे खेळली जाणार आहे.
एकूण सव्वासहा लाख रूपये पारितोषिक रक्कम असलेल्या या स्पर्धेचे आयोजन सोलारीस क्लबतर्फे करण्यात आले आहे. स्पर्धेत सुमारे २०० खेळाडू सहभागी होणार आहे.
स्पर्धेबाबत सोलारीसचे संचालक जयंत पवार आणि सीईओ हृषीकेश भानुशाली म्हणाले की, ज्या खेळाडूंनी आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक राष्ट्रीय विजेतेपदके पटकावली असून, आपल्या काळातील ते सर्वोत्तम खेळाडू होते, अशा अनेक माजी खेळाडूंनी या स्पर्धेत आपला सहभाग निश्चित केला आहे. ही स्पर्धा ३५ वर्षांवरील, ४५ वर्षांवरील, ५५ वर्षांवरील, ६५ वर्षांवरील आणि ७० वर्षांवरील अशा पाच गटांत एकेरी आणि दुहेरी खेळवली जाईल.