किवळे येथील सिंबायोसिस स्किल अॅण्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीतील विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष प्रशिक्षणाच्या आरंभ आणि कुशल प्रशिक्षित विद्यार्थ्यांसाठी आयोजित जॉब फेअरच्या उद्घाटन प्रसंगी नवाब मलिक बोलत होते. यावेळी सिंबायोसिसचे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार, प्रधान कुलपती डॉ. स्वाती मुजुमदार, कुलगुरू डॉ. अश्विनी कुमार आदी उपस्थित होते. राज्य शासनाने राज्यातील आयटीआय आणि पॉलिटेक्निक उघडण्याच्या धर्तीवर कौशल्य विद्यापीठाचे कॅम्पस पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे सिंबायोसिसमधील विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष प्रशिक्षणास सुरूवात करण्यात आली.
कार्यक्रमात डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी कौशल्य अभ्यासक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. तर कौशल्याआधारित शिक्षण ऑनलाईन पध्दतीपेक्षाही प्रत्यक्षिक पध्दतीने अधिक प्रभावितरित्या होते. त्यामुळे विद्यार्थी सुध्दा प्रत्यक्ष प्रशिक्षणासाठी उत्सूक होते, असे डॉ. स्वाती मुजुमदार यांनी सांगितले.
-------------------