शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
7
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
8
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
9
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
10
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
11
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
12
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
13
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
14
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
15
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
16
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
17
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
18
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
19
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

...अन्यथा सर्व खासगी कोविड हॉस्पिटल्स बंद करणार; उपमुख्यमंत्र्यांच्या बारामतीत डॉक्टर संघटनांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2020 8:00 PM

बारामतीत डॉक्टरांना झाली होती शिवीगाळ व मारहाण...

ठळक मुद्देडॉक्टर संघटनांचे प्रांताधिकाऱ्यांना दिले निवेदन

बारामती: कोरोना संकटात अविरत काम करणाऱ्या डॉक्टर्स,कर्मचारी यांच्याशी गैरवर्तन व शिवीगाळ करण्यात आली. तसेच एका डॉक्टरांना धक्काबुक्की केल्याचा धक्कादायक प्रकार बारामती शहरात दोन दिवसांपुर्वी घडला. त्यामुळे शहरातील सर्व डॉक्टर संघटनांनी एकत्र येत प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिले.

शहरातील आय.एम.ए., मेडिकोज गिल्ड, निमा व बारामती होमिओपॅथी संघटनांच्या वतीने प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे,उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगांवकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आरोपीला तातडीने ४८ तासांच्या आत अटक करावी. अन्यथा असुरक्षित वातावरणात काम करणे अशक्य असल्याने कोविड रुग्णालये आपले दवाखाने बंद ठेवतील, वैद्यकीय सेवा थांबविण्यात येईल,असा इशारा दिला आहे.

यावेळी पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील,वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संंजीवकुमार तांबे सिल्वर ज्युबिली चे वैद्यकिय अधिक्षक डॉ.सदानंद काळे ,मुख्याधिकारी किरणराज यादव उपस्थित होते. मेडिकोज गिल्डचे अध्यक्ष डॉ. संजय यांनी आरोपीला ताबडतोब अटक करून कठोर शासन करण्याची आग्रहि मांडणी केली. तसेच डॉ. राहुल जाधव यांनीही घडलेला प्रसंग येथे मांडत आरोपीविरुद्ध लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली.

डॉ. सुजित अडसूळ यांनी डॉक्टरांना न्याय द्या,असे प्रशासनाला साकडे घातले.''आयएमए'' च्या अध्यक्षा डॉ.विभावरी सोळंकी यांनीहीडॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी कठोर कारवाईची मागणी करत डॉक्टरांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याची मागणी केली. डॉ पांडुरंग गावडे यांनी घटनेचा तीव्र शब्दात निषेध करीत आपल्या भावना तीव्र शब्दात मांडल्या.मेडिकोज गिल्ड चे सचिव डॉ. तुषार गदादे यांनी ४८ तासात आरोपीला अटक न केल्यास सर्व खासगी कोविड हॉस्पिटल्स बंद करण्याचा इशारा सर्व अधिकाऱ्यांना दिला.त्याची दखल घेत उपविभागीय पोलीस अधिकारी शिरगावकर यांनी लवकरात लवकर आरोपीला अटक करण्याची ग्वाही दिली.

 प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी आरोपीला अटक करून शक्य असल्यास तडीपार करण्याची शिफारस पोलीस खात्याला केली. तसेच डॉक्टरांना सध्या भेडसावत असलेल्या सर्व संकटात मदत करायचीही ग्वाही दिली .घडलेला प्रसंग अत्यंत घृणास्पद असून घटनेचा तीव्र शब्दात निषेध करत असल्याचेही त्यांनी सांगितले. ''आयएमए'' चे सेक्रेटरी डॉ. संतोष घालमे यांनी आभार मानले.

यावेळी डॉ. आशिष जळक, डॉ. चंद्रकांत पिल्लई, डॉ. राजेंद्र चोपडे, डॉ. प्रशांत मांडण, डॉ. राजेश कोकरे, डॉ. चंद्रशेखर धुमाळ, डॉ. सचिन घोरपडे, डॉ. जितेंद्र आटोळे, डॉ. सचिन घोळवे, डॉ. सूरज भगत, डॉ. हर्षल राठी,डॉ.विक्रम शिरदाळे,  डॉ. अमर पवार, डॉ. प्रदीप व्होरा, डॉ. डी. एन. धवडे, डॉ. प्रशांत माने, डॉ. दिनेश ओसवाल, डॉ. आनंद हारके, डॉ. प्रितम ललगुणकर, डॉ. भास्कर जेधे, डॉ. वृषाली हारके आदी उपस्थित होते.————————————————

टॅग्स :Baramatiबारामतीdoctorडॉक्टरAjit Pawarअजित पवारhospitalहॉस्पिटलCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस