शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
2
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
3
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
4
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
5
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
6
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
7
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
8
अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
10
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
11
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
12
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
13
Stock Market Boom : राज्यातील महायुतीच्या 'महा'विजयानं शेअर बाजारात जल्लोष, Sensex-Nifty मध्ये तेजी; Adani चे शेअर्स वधारले
14
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
16
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
17
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
18
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
19
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
20
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र

पुण्याचा विकास हाच आमचा ध्यास

By admin | Published: February 19, 2017 4:59 AM

गेल्या दोन वर्षांत केलेली विकासकामे हाच आमचा अजेंडा. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या गलथान कारभारामुळे पुण्याच्या विकासाला ‘खो’ लागला होता. जी कामे त्यांनी

पुणे : गेल्या दोन वर्षांत केलेली विकासकामे हाच आमचा अजेंडा. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या गलथान कारभारामुळे पुण्याच्या विकासाला ‘खो’ लागला होता. जी कामे त्यांनी १० ते १५ वर्षांत केंद्रात आणि राज्यात सत्ता असतानाही केली नाहीत तीच कामे आम्ही केवळ दोन वर्षांत मार्गी लावून दाखविली, असे पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितले. प्रचारातील विविध मुद्यांवर ‘लोकमत’शी बोलताना बापट म्हणाले, ‘शाब्दिक कोट्या, आरोप-प्रत्यारोप निवडणुकीपुरते गाजतात पण तुम्ही केलेल्या विकासकामांची दखल लोक पिढ्यान्पिढ्या घेतात. शहराचा सुनियंत्रित आणि समतोल विकास होणे ही गरज होती. पण काँग्रेस- राष्ट्रवादीच्या निष्क्रियतेमुळे तसे झाली नाही. आम्ही सत्तेत येताच पुणे मेट्रो प्रकल्पासाठी सक्रीय प्रयत्न केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनानुसार माझ्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. समितीच्या माध्यामतून आम्ही पुणे मेट्रो प्रकल्पासाठी ९५० कोटींचा निधी मंजूर करू घेतला. प्रस्तावित मेट्रो मार्गाप्रमाणेच आयटी क्षेत्राची गरज ओळखून केवळ १५ दिवसांत मुख्यमंत्र्यांनी हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मागार्ला मंजुरी दिली. विकास आराखडा, पीएमआरडीए यांच्या बाबतीतही तेच झाले. क्षुल्लक गोष्टींचे राजकारण करून १० ते १५ वर्षे हे प्रकल्प त्यांनी रखडवले होते. आम्ही त्यासाठी योग्य तो पाठपुरावा करून त्याला मूर्तरूप दिले. हे विकासाचेच द्योतक म्हणावे लागेल.पुण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळाची गरज ओळखून पुरंदरमध्ये सुसज्ज विमानतळ येत्या काही वर्षांत सज्ज होईल. शेतकऱ्यांचे यामध्ये कोणतेही नुकसान होऊ दिले जाणार नाही. लोहगाव विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी केंद्रीय मंत्री मनोहर पर्रिकर व नितीन गडकरी यांच्या समवेत माझी ठोस चर्चा झाली असून आता लोहगाव विमानतळाचा प्रश्नही मार्गी लागेल.शहरात कचरा निर्मुलनाच्या सक्षम सुविधा राबविण्यात प्रशासन व राज्यकर्त्यांना अपयश आल्याने कचरा प्रश्न पेटल्याचे सांगून बापट म्हणाले, ‘‘त्यामुळे पालकमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यावर मी तातडीने बैठक बोलावून शहरातील कचरा शहरातच जिरवला जावा, असे आदेश प्रशासनाला दिले. यातूनच आता शहराच्या विविध भागांत छोटे कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्यात येत आहेत. वनविभागाच्या जागेत साकारत असलेला पिंपरी सांडस घनकचरा प्रकल्पही आता कार्यान्वित होण्याच्या मार्गावर आहे. येत्या काळात रहिवासी सोसायट्यांसाठी स्वतंत्र्य महामंडळ स्थापन करण्याचा आमचा मानस आहे. याद्वारे सौरवीजनिर्मिती प्रकल्प, रेनवॉटर हार्वेस्टिंग, कचरा व्यवस्थापन प्रकल्प, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प यांसारख्या पर्यावरणपूरक प्रकल्पाची उभारणी करू इच्छिणाऱ्या सोसायट्यांना शासनाचे अनुदान प्राप्त होईल. पुण्याला यंदाच्या वर्षी प्रथमच पाणीटंचाईचा भीषण सामना करावा लागला. राजकीय इच्छाशक्ती अभावी पाण्याचे आॅडिट हा विषय दुर्लक्षित राहिला आहे. चोवीस तास पाणी हवे असेल तर प्रत्येक थेंबाच्या हिशेबालाही आपल्याला प्राधान्य द्यावे लागेल. मी पालकमंत्री झाल्यावर दीड ते दोन टीएमसी पाणी प्रक्रिया करून शेतीला सोडले. यामुळे तेथील शेतकरी खुश झाला आणि पुणेकरही माझ्यावर नाराज झाले नाहीत. आज पुण्याला पुरवठा जलवाहिन्यांत ३० टक्के पाण्याची गळती आहे. ती रोखण्याबरोबरच पाण्याच्या पुर्नवापर होण्यासाठी आवश्यक प्रकल्प उभारण्यावरही आम्ही भर देणार आहे.(प्रतिनिधी)विरोधकांकडून राजकारण‘गुंडांचा पक्ष’ या आरोपावर विरोधकांवर पलटवार करताना ते म्हणाले, ‘आमच्या पक्षात जे आले ते गुंड असे ते म्हणतात. इकडे आले की ते कसे गुंड होतात. त्यांच्याकडे ते सज्जन होते. आमच्याकडे ते आले म्हणून त्यांना दु:ख होते. ते गुंड वाटू लागतात. याच्यातही विरोधकांकडून राजकारण केले जात आहे. आम्ही इतक्या खालच्या पातळीवर जात नाही. विकासाच्या मुद्यावरच निवडणुकीला सामोरे जात आहोत. पुणेकरांसाठी आम्ही काय करणार, हे ऐकायला लोक उत्सुक असतात.‘आपआपसांत न भांडता युती करून एकत्रितपणे निवडणूक लढवावी, असे जनमानस होते. पण जागावाटपावरून समझोता न झाल्याने युती तुटली. ही युती आम्ही तोडली नसून शिवसेनेने तोडली आहे. याचा फटका शिवसेनेलाच अधिक प्रमाणात बसेल. - गिरीश बापट, पालकमंत्री, पुणे