कोविडमध्ये आमचं १५ हजार कोटी रूपयांचे नुकसान; मॉल पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची परवानगी द्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2021 09:20 PM2021-08-06T21:20:02+5:302021-08-06T21:24:07+5:30

शॉपिंग सेंटर्स असोसिएशन ऑफ इंडियाची मागणी

Our loss of Rs 15,000 crore in Covid; Allow the mall to start at full capacity | कोविडमध्ये आमचं १५ हजार कोटी रूपयांचे नुकसान; मॉल पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची परवानगी द्या

कोविडमध्ये आमचं १५ हजार कोटी रूपयांचे नुकसान; मॉल पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची परवानगी द्या

googlenewsNext

पुणे : पुणे शहरातील शॉपिंग मॉल्समध्ये बाह्य एजन्सीद्वारे कर्मचाऱ्यांसह अंदाजे ७६ हजार लोक काम करतात. कोविड निर्बंधांमुळे उद्योगांचे जवळपास १५ हजार कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे. किरकोळ स्टोअर्स आणि रेस्टॉरंट्समध्ये काम करणारे जवळपास ८० टक्के कर्मचारी आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत आणि त्यांच्या उपजीविकेवर सर्वात जास्त परिणाम झाला आहे. त्यामुळे शहरातील सर्व मॉल पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची प्रशासनाने परवानगी द्यावी, अशी मागणी शॉपिंग सेंटर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या (एससीएआई) वतीने करण्यात आली आहे.

पुण्यातील सर्व मॉलमध्ये काम करणारे किरकोळ विक्रेते आणि कर्मचारी हे अमानोरा मॉलच्या बाहेर जमले आणि कामाच्या अधिकाराच्या असमानतेचा निषेध केला. मॉलमधील सुमारे २०० कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी दुपारी ४ वाजता आंदोलन केले. राज्य शासनाकडे त्यांनी काम करण्याचे समान अधिकार देण्याची मागणी यावेळी केली आहे.

शॉपिंग सेंटर इंडस्ट्री मॉल, रिटेल आणि मॅन्युफॅक्चरिंग रिटेलशी संबंधित असलेल्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे १.२ कोटी उपजीविकेला आधार देत आहे. या क्षेत्रात काम करणारे बहुतेक कर्मचारी इतर राज्यातून येत आहेत. अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे आणि कर्मचाऱ्यांमध्ये बेरोजगारी आणि जगण्याची प्रचंड भीती आहे.
-----
बरेच कर्मचारी कोणत्याही पर्यायी उत्पन्नाचे स्त्रोत नसताना बेरोजगार आहेत. पर्यायी उत्पन्नाचे स्त्रोत नसल्यास, हे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांकडे जगण्याचे कोणतेही साधन राहणार नाही. जर कोविड निर्बंध चालू राहिले तर बेरोजगारी वर्तमानापेक्षा लक्षणीय खराब होण्याचा धोका आहे. ते मॉल मालकांकडे बघत आहेत, दुर्दैवाने आम्ही असहाय आहोत. 
- सुरजीत सिंह राजपुरोहित, समिती सदस्य, शॉपिंग सेंटर्स असोसिएशन ऑफ इंडिया

Web Title: Our loss of Rs 15,000 crore in Covid; Allow the mall to start at full capacity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.