शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

"अजित दादावर आमचं प्रेम पण पवार साहेबांना एकटं सोडणार नाही" पुण्यातील NCP कार्यकर्त्यांच्या भावना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2023 11:02 AM

आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यशवंतराव चव्हाण स्मृती स्थळाच्या दर्शनासाठी शेकडो कार्यकर्त्यांसह कराडला गेले आहेत...

पुणे : रविवारी महाराष्ट्रात मोठा राजकीय उलथापालथ झाली. राष्ट्रवादी काँग्रेसमधील ९ जणांनी शिंदे सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. यामध्ये अजित पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ या जेष्ठ नेत्यांसह इतर पाच जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्याचबरोबर आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळपास ४० आमदरांचा पाठिंबा असल्याचा दावा अजित पवारांनी केला होता. आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यशवंतराव चव्हाण स्मृती स्थळाच्या दर्शनासाठी शेकडो कार्यकर्त्यांसह कराडला गेले आहेत.

कालच्या फुटीनंतर पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी शरद पवारांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याचे दिसून आले. यावेळी बोलताना शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, कालच्या घटनाक्रमानंतर पुण्यातील पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही सर्व पवार साहेबांसोबत आहोत आणि राहू. ही लढाई जातीवाद, धर्मवादाच्या विरोधातील आहे. मागील २५ वर्षांपासून माझ्यासारखे अनेकजण भाजप आणि आरएसएसच्या विचारधारेविरोधात लढत आहोत. २०१४ नंतरच्या काळात कोणताही दबाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढे नेला. 

अजित दादांवर जरी आमचं प्रेम असलं तरी अशा परिस्थितीत शरद पवारांना सोडून जाणे हे कुठल्याच कार्यकर्त्यांना पटले नाही. त्यामुळे आम्ही शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. आम्ही शरद पवार यांच्यासोबत पुन्हा जोमाने उभे राहून लढू, असा विश्वासही जगताप यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाcongressकाँग्रेसMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्ष