पुणे : राजस्थानमध्ये बॉम्ब बनविण्याचे साहित्य जमा करुन बॉम्बस्फोटाची साखळी तयार करण्याच्या प्रयत्नात असलेले आणि गेल्या दीड वर्षांपासून फरार असलेल्या तीन दहशतवाद्यांना पुणेपोलिसांनी पकडले होते. कोथरूड मधून तिघांना पकडले होते, त्यांना कोंढव्यात घेऊन गेले असताना हा शाहनवाज पळून गेला होता. त्याचा शोध सुरू आहे. शाहनवाज असे या पळून गेलेल्या दहशवाद्याचे नाव आहे. एटीएसने थेट त्याचे फोटो जाहीर केले आहेत.
कोथरुड पोलीस ठाण्याचे बीट मार्शल प्रदीप चव्हाण आणि अमोल नझन हे १८ जुलै रोजी गस्त घालत होते. त्यावेळी पहाटे पावणे तीन वाजता त्यांनी ३ संशयित दुचाकी चोरांना पकडले. त्यानंतर त्यांना घरझडतीसाठी नेण्यात आले. त्यावेळी त्यांच्यातील एक जण पळून गेला. पोलिस पथकाने त्यांच्यापैकी दोघांना पकडले. कोंढव्यातील त्यांच्या घरझडतीत पोलिसांनी एक जिवंत काडतुस, ४ मोबाईल आणि लॅपटॉप सापडले. पोलिसांनी ते जप्त केले. सुरुवातीला ते वाहन चोर असल्याचा संशय होता.
राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीने प्रत्येकी ५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केलेले राजस्थानमधील दोन अतिरेकी गेल्या दीड वर्षांपासून पुण्यात लपवून बसले असल्याचे उघडकीस आले आहे. एका वाहन चोरीच्या प्रकरणात नाकाबंदीच्या दरम्यान दोघांना ताब्यात घेतले असताना ते फरार अतिरेकी असल्याचे निष्पन्न झाले आहे. इम्रान खान आणि मो़ युनूस साकी (रा. रतलाम, मध्यप्रदेश)अशी या दोन संशयितांची नावे आहेत. तर पळून गेलेल्या शाहनवाज शोध सुरु आहे. कोंढव्यातील त्यांच्या घरझडतीत पोलिसांनी एक जिवंत काडतुस, ४ मोबाईल आणि लॅपटॉप सापडले. पोलिसांनी ते जप्त केले.