पुणे : अमूल, मदर, चितळे यांच्यासह सर्व मोठ्या ब्रँडने दुधाच्या दरात वाढ केल्यानंतर आता राज्यभरातील दूध व्यावसायिकांच्या संघटनेने गायी व म्हशीच्या दरात प्रत्येकी २ रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता राज्यभरात सर्व छोट्या-मोठ्या दुधाच्या ब्रँडच्या दरात गुरुवार (दि. १८) पासून २ रुपयांनी वाढ होणार आहे.
राज्य दूध उत्पादक व प्रक्रियाकारक कल्याणकारी संघाचे सचिव प्रकाश कुतवळ म्हणाले, ‘‘महाराष्ट्रातील सर्व प्रमुख दूध व्यावसायिकांची बुधवारी (दि. १७) सायंकाळी झूम मिटिंग पार पडली. यात डिझेल, पॅकिंग मटेरियल आणि विजेच्या दरात झालेली वाढ विचारात घेऊन दूध विक्री दरात २ रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यभरातील विविध ब्रँडचे दर वेगवेगळे आहेत. या निर्णयामुळे त्यांच्या आताच्या दरात दोन रुपयांनी वाढ होणार आहे.’’