वातावरणातील बदलाचा विपरीत परिणाम शेतीवर आणि पर्यायाने पिकांवर होत आहे. अतिवृष्टी पाऊसानंतर मध्यनतरी ढगाळ हवामान झाल्याने फळबागांसह, कांदा , तुर, ज्वारी गहू आदी पिकांवर करपा व तांबेरा व मावा रोगाचा प्रादुर्भाव, निर्माण झाल्याने उत्पादन व उत्पन्न घटल्याने शेतकरीवर्ग धास्तावला आहे.
पुरंदर तालुक्यातील वाल्हे व परिसरामधील शेतकरी गेली अनेक वर्षे दुष्काळी होता. मागील वर्षी पाऊस चांगला झाला. व यावर्षी अतिवृष्टीमुळे आणि आता अतिवृष्टीमधून बचावलेल्या पिकांना होत असलेले विविध रोग यामुळे येथील शेतकरी मेटाकुटीस आला आहे. अवकाळी पाऊसानंतर ढगाळ हवामान झाल्याने फळबागांसह ,पिकांवर करपा व तांबेरा व मावा रोगाचा प्रादुर्भाव निर्माण झाल्याने उत्पादन व उत्पन्न घटल्याने शेतकरीवर्ग धास्तावला आहे.
वाल्ह्यातील शेतकरी शेतीसह दुध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर करतात. जनावरांना ओला चारा म्हणून, मका, कडवळ आदी चारा करतात. मागील काही दिवसापासून मका पिकांवर लष्करी आळीचा प्रादुर्भाव झाल्याने मका पिक वाचवण्यासाठी अनेक शेतकरी वर्ग त्यासाठी औषध फवारणी करताना दिसतात त्याच बरोबर परिसरात गव्हाचे पिक मोठ्या प्रमाणावर असते.त्याला मावा किड पडु लागल्या मुळे गव्हा वरती किटक नाशक फवारनी करताना शेतकरी संतोष सोपान भुजबळ.