तालुक्यात बहुतांशी भागांत बारमाही पाण्याची उपलब्धता असल्याने उन्हाळी पिकांमध्ये मका, कोबी, फ्लॉवर, बीट, भुईमूग, मिरची, कांदा आदी पिकांबरोबरच टोमॅटोचे मोठे उत्पादन घेतले जाते. परंतु सध्या टोमॅटोला बाजारभाव नाहीत. त्यातच तिरंगा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. टोमॅटोला या तिरंगा रोगामुळे वेगवेगळे चट्टे पडल्याने टोमॅटो रस्त्यावर टाकून द्यावी लागत आहेत. त्यातच चांगल्या टोमॅटोस २० किलोच्या कॅरेटला २० ते ५० रुपये बाजारभाव मिळत आहे. त्यामध्ये मजुरीचा खर्चही भागत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या पिकास भांडवली खर्च मोठ्या प्रमाणात येत आहे, लागवडीपासून ते खते, मशागत, मांडव, औषधफवारणी आदी खर्चाचा विचार करता शेतकरी तोट्यात जात आहे.
अशा या टोमॅटोस बाजारभाव नाहीत. त्यातच तिरंगा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने बळीराजावर कर्जाचा डोंगर उभा राहत आहे.
०४ आळेफाटा टोमॅटो
टोमॅटोवर पडलेल्या तिरंगा रोगामुळे टोमॅटो टाकून द्यावे लागत आहे.