सासवड - उन्हाळ्याच्या सुटीत ग्रामीण आणि शहरी भागातील मुले मैदानी खेळाऐवजी टीव्ही, मोबाइल, व्हिडीओ गेम पाहण्यातच मग्न आहेत. त्यामुळे हे ग्रामीण बाज असलेले मैदानी खेळ काळाच्या पडद्याआड गेले आहेत. वर्षानुवर्षे चालत आलेले ग्रामीण भागातील मैदानी खेळ आधुनिकीकरणामुळे व मोकळ्या मैदानअभावी लोप पावत चालले आहेत. या खेळांना ऊर्जितावस्था आणण्याची गरज आहे.पूर्वी मे महिन्यात उन्हाळ्याची सुटी लागली, की ग्रामीण भागात पूर्वी लहान मुले गोट्या, विटीदांडू, गलोरी, लगोरी, सूरपारंब्या, कुईकुई जामीन कोण, टायर फिरविणे, भवरा, आट्यापाट्या, लपाछपी, अबाधबी, आर मारणे हे मुलांचे खेळ, तर काचकवडी, जिबली, दोरीउड्या, लंगडी, चल्लस, मामाचं पत्र, खड्यांनी खेळणे हे मुलींचे खेळ पूर्वी खेळले जात होते.हे खेळ खेळत असताना दिवसभर परिसर मुलांच्या आवाजाने, दंग्याने गजबजून जात असे. या खेळामुळे मुलांची शारीरिक आणि मानसिक वाढही होते आणि मुलांमध्ये प्रतिकारशक्ती वाढते. या मैदानी खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी आजकाल पालकांनीच मोबाइलमधून बाहेर पडण्याची गरज आहे.मोबाइलवचर मुलं व्यस्तसध्या जग बदलत आहे. या बदलत्या काळाबरोबर खेळही बदलले आहेत. मुलांच्या हातात विटीदांडू, भवरा याऐवजी मोबाइल आला आहे. मुले मोबाइलवर गेम खेळण्यातच रमत आहेत.मोबाईलबरोबरच टीव्हीवरील कार्टून दिवसभर बघत बसणे, व्हिडीओ गेम यामुळे मुलांनी ग्रामीण खेळांकडे पाठ फिरविली आहे. पण या आधुनिक मोबाइल आणि टीव्हीमुळे मुलांमध्ये न्यूनगंडाचीभावना निर्माण होत आहे.मुले चिडचिडी बनत असून, त्यांची प्रतिकारशक्ती कमी होत चालली आहे. त्यामुळे मुलांनी आजही ग्रामीण खेळ खेळणे गरजेचे असल्याचे मत विवेकानंद ग्रुपचे अध्यक्ष व माजी नगरसेवक संतोष गिरमे यांनी व्यक्त केले.
मैदानी खेळ होतायेत काळाच्या पडद्याआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2018 2:55 AM