पुणे : गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्या दोघा जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून गावठी बनावटीचे पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. बलजितसिंग गुरुमुखसिंग लबाना (वय ३७, रा. बिजलीनगर, चिंचवड), संतोष श्रीरंग चव्हाण (वय ४१, रा. नेरुळ, नवी मुंबई, मूळ रा. महागाव, सातारा) अशी अटक आरोपींची नावे आहेत. सहायक पोलीस आयुक्त सुरेश भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, दरोडा प्रतिबंधक पथकाचे शैलेश जगताप यांना आरोपी बेकायदा शस्त्रांच्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती खबऱ्यामार्फत मिळाली होती. त्यानुसार, उपायुक्त पी. आर. पाटील, सहायक आयुक्त सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर परिसरातील सिमला आॅफिस चौकात असलेल्या खाऊगल्लीजवळ सापळा लावला. दोन मोटारसायकलवरून आलेल्या आरोपींना पोलिसांनी पकडले. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कदम, सहायक निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, शैलेश जगताप, संतोष पागार, परवेज जमादार, राहुल घाडगे यांच्या पथकाने केली
बेकायदा पिस्तूल बाळगणारे गजाआड
By admin | Published: December 24, 2016 12:52 AM