शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

कोरोना संसर्ग आपत्ती निवारणाच्या कामामुळे राज्यभर शिक्षकांचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 6:40 PM

कोरोनाच्या संसगापार्सून बचावासाठी पुरेशी साधने नसूनही  शिक्षकांनी महिनाभर सलग आपत्ती निवारणाचे काम केले आहे.

ठळक मुद्देआपत्ती निवारण कामातून वगळण्याची शिक्षक संघाची मागणीकोरोना संकटामुळे पोलीस व आरोग्य कर्मचारी यांचा ताण कमी करण्यासाठी प्राथमिक शिक्षक

बारामती :राज्यभर आपत्ती निवारणाची कामे शिक्षकांना दिली जात आहेत. दुसरीकडे मे महिन्यातही लर्न फ्रॉम होम योजनेअंतर्गत ऑनलाइन शिक्षण द्यावे लागत असल्याने राज्यभर प्राथमिक शिक्षकांमध्ये संताप आहे. कोरोना संसर्गाच्या आपत्ती निवारणाच्या कामातून प्राथमिक शिक्षकांना वगळण्याची मागणी प्राथमिक शिक्षक संघाने केली आहे अशी माहिती जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी दिली.कोरोना संकटामुळे पोलीस व आरोग्य कर्मचारी यांचा ताण कमी करण्यासाठी प्राथमिक शिक्षकांना आपत्ती निवारणाच्या कामावर जुंपल्याने शिक्षकांमध्ये नाराजी आहे. राज्यभरातील शिक्षकांना सर्वेक्षणाचे काम देण्यात आले. शहरात तसेच ग्रामीण भागात आजारी रुग्ण शोधण्याचे तसेच स्थलांतरित लोकांचे लोकांचा शोध घेण्याची काम शिक्षकांना देण्यात आले.  हे काम पूर्ण होण्यापूर्वीच अनेक शिक्षकांना रस्त्यावर चेक पोस्टवर तपासणीचे काम देण्यात आले.तर काही ठिकाणी रेशन दुकानावर धान्य वाटप सुरळीत होण्यासाठी शिक्षकांना जबाबदारी देण्यात आली, अनेक गावांमध्ये शिक्षकांना पेट्रोल पंपावर निरीक्षणाचे काम देण्यात आले आहे . रात्रंदिवस हे काम करावयाचे असल्याने शिक्षक तणावाखाली असल्याचे चित्र आहे .नुकतेच  जत तालुक्यातील डफळापूर गावातील चेक नाक्यावर असलेल्या शिक्षकाला एका ट्रकने चिरडून मारल्याची घटना घडली आहे , भोर तालुक्यातील चेलाडी व मोरवाडी येथील चेक पोस्टवर शिक्षकांना शिवीगाळ व दमदाटी करण्यात आली .त्यामुळे राज्यभरातील शिक्षकांमध्ये संताप असल्याची माहिती सरचिटणीस खंडेराव ढोबळे यांनी दिली. 

शालेय काम विस्कळीत ...लॉकडाऊनच्या काळात  शिक्षण विभागाने शाळा बंद शिक्षण सुरू या योजनेखाली आॅनलाइन शिक्षण सुरू केले आहे .त्यामुळे दिवसभर  शिक्षक व विद्यार्थी व्यस्त आहेत .मात्र आपत्ती निवारणाच्या कामामुळे या योजनेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.——————————————— पडेल ते काम करा...राज्यभर प्राथमिक शिक्षकांना सर्वेक्षण,  चेक पोस्ट ,पेट्रोल पंप, रेशनिंग दुकान, दवाखाने, दारू दुकान यासह पडेल ते काम करा ,असा अघोषित फतवा निघाल्याने अवहेलना होत असल्याची शिक्षकांची भावना आहे.——————————————————— चेक पोस्टच्या कामात रात्रभर विना सुरक्षा रस्त्यावर थांबावे लागते. कोरोनाच्या संसगापार्सून बचावासाठी पुरेशी साधने नसूनही  शिक्षकांनी महिनाभर सलग आपत्ती निवारणाचे काम केले आहे, आता केंद्रीय आरोग्य विभागाच्या निदेशार्नुसार शिक्षकांना विश्रांती देऊन अन्य विभागातील कर्मचारी नियुक्त करावेत. बाळासाहेब मारणे, जिल्हाध्यक्ष, शिक्षक संघ पुणे———————————

टॅग्स :BaramatiबारामतीTeacherशिक्षकCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसzp schoolजिल्हा परिषद शाळा