पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) सुरू केलेल्या ‘अटल’ या पाच रुपयांत पाच किलोमीटर प्रवास या बससेवेला प्रवाशांचा प्रतिसाद वाढू लागला आहे. दिवसभरात सुमारे ५० हजार प्रवासी प्रवास करत असून त्याद्वारे सुमारे अडीच लाख रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याची माहिती पीमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप यांनी दिली.
प्रवाशांची अनेक वर्षांपासून पाच रुपयांत प्रवासाची मागणी होती. त्यानुसार दसऱ्याच्या मुहूर्तावर शहराच्या मध्यवर्ती भागात ९ मार्गांवर तर अन्यत्र ५३ मार्गांवर अटल बससेवा सुरू करण्यात आली. पाच रुपयांत पाच किलोमीटर प्रवास अशी ही योजना आहे. या योजनेसाठी स्वतंत्र लोगो, मार्गफलक तयार करण्यात आल्याने प्रवाशांना या बस ओळखणे शक्य होत आहे. केवळ पाच रुपयांत पाच किलोमीटरचा प्रवास करता येत असल्याने या सेवेला प्रवाशांचा प्रतिसाद वाढू लागला आहे.
शहराच्या मध्यभागात ९ मार्गांवर ९० बसमार्फत ही सेवा सुरू आहे. या बसमधून शुक्रवारी २१ हजारांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला. तर आगार पातळीवरील सेवेच्या ७४ बसला २८ हजारांहून अधिक प्रवाशांनी प्रतिसाद दिला. दोन्ही सेवेचे मिळून जवळपास एका दिवसांत ५० हजार प्रवाशांचा महत्वाचा टप्पा पार करता आला आहे. यातून शुक्रवारी सुमारे अडीच लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले, असे जगताप यांनी सांगितले.------------अटल बससेवेला मिळालेला प्रतिसाद (२९ ऑक्टोबर)शहराचा मध्यभागएकुण मार्ग - ९बस - ९०प्रवासी - २१ हजार २५९उत्पन्न - १ लाख ६ हजार २९५--------------आगारस्तरएकुण मार्ग - ५३एकुण बस - ७४प्रवासी - २८ हजार ५३३उत्पन् - १ लाख ४२ हजार ६६५