राजकारणाच्या ठिकाणी राजकारण सुरूच राहील, परंतु आमचा केंद्रबिंदू हा सर्वसामान्य माणूस असून त्यांच्या सेवेसाठी शिवसैनिकांनी पुढाकार घ्यावा. पुणेकर नागरिक सुज्ञ आहेत शिवसैनिकांची सेवा ते विसरणार नाहीत, असे सूचक विधान त्यांनी या वेळी केले.
पुणे महापालिका व सीवायडीए या संस्थेच्या वतीने येरवडा येथे डॉ. आंबेडकर कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. या सेंटरचे ऑनलाइन उद्घाटन खासदार राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. या उद्घाटन समारंभात उपमुख्यमंत्री अजित पवार व विधान परिषदेचे उपसभापती नीलम गोरे यांनी ऑनलाइन शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला शिवसेना नेते संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर, बाळा कदम, उपमहापौर सुनीता वाडेकर, शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार, नगरसेवक संजय भोसले, नगरसेविका श्वेता चव्हाण, शहरप्रमुख संजय मोरे, माजी नगरसेवक सागर माळकर, जानू आखाडे, संयोजक नगरसेवक अविनाश साळवे, सीवायडीए संस्थेचे संचालक मॅथ्यू मॅटम उपस्थित होते.
या कोविड सेंटरसाठी सीवायडीए, शीला साळवे ट्रस्ट, बहुजनहिताय सामाजिक संस्था यांच्यासह इतर अनेक सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतलेला आहे. येथील कोविड सेंटरमध्ये १३० बेड विलगीकरण रुग्णांसाठी, बालकांसाठी विशेष कक्ष असून त्यातील १० बेड ऑक्सिजन सहा तर इतर चाळीस बेड बालकांसाठी उपलब्ध असणार आहेत. वीस बेड ज्येष्ठ नागरिकांसाठी असतील अशी २०० कोवीड रुग्णांची पूर्णवेळ उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. एक्स रे व लॅब तपासणीसह २४ तास रुग्णवाहिका व डॉक्टर सेवा उपलब्ध राहणार आहे. अशी माहिती कार्यक्रमाचे संयोजक नगरसेवक अविनाश साळवे यांनी यावेळी दिली.
फोटो ओळ - येरवडा येथील डॉ. आंबेडकर कोविड सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी शिवसेना नेते संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर,उपमहापौर सुनीता वाडेकर व इतर मान्यवर.