पुणे : नियोजित बस फेऱ्यांच्या तुलनेत प्रत्यक्षात रस्त्यावर तब्बल ४ ते ५ हजार फेºया कमी तसेच ब्रेकडाऊनचे सातत्य यामुळे रस्त्यांवर धावणाºया बहुतेक बस ‘ओव्हरफ्लो’ होत आहेत. या ‘ओव्हरफ्लो’ बसमध्ये प्रवाशांचा जीव गुदमरून जात आहे. गर्दीच्यावेळी अनेकदा एका बसमध्ये ७० ते १०० प्रवासी दाटीवाटीने उभे राहिलेले असतात. दरवाजाला लटकून धोकादायकपणे प्रवास करण्याची वेळ अनेकांवर येत आहे.पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) च्या ताफ्यात जवळपास २ हजार बस आहेत. त्यापैकी ६५३ बस भाडेतत्वावरील आहेत. तर उर्वरीत बस पीएमपीच्या मालकीच्या आहेत. मात्र, या बसपैकी केवळ १३०० ते १४०० बसच मार्गावर असतात. यातील जवळपास १५० बस दररोज मार्गावरच बंद पडतात. त्यामुळे प्रत्यक्षात उपलब्ध बसची संख्या आणखी रोडावते. परिणामी, गर्दीच्या वेळी प्रवाशांचे मोठे हाल होतात. वेळेवर बस न येणे, दाटीवाटीने प्रवासाचा अनुभव दररोजचाच आहे. मात्र, असे असूनही त्याकडे ना पीएमपी प्रशासनाचे लक्ष आहे, ना प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे. नियमितपणे बसने प्रवास करणाºया प्रवाशांसाठी दुसरा पर्यायही नाही. प्रजासत्ताक दिनादिवशी पीएमपीच्या एकुण १६८५ बसचे नियोजन करण्यात आले होते. पण प्रत्यक्षात १३३९ बस मार्गावर येऊ शकल्या.बसच्या हजारो नियोजित फेºया दररोज रद्द होत असल्याने पीएमपीचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होत आहे. मागील अनेक वर्षांपासून हीच स्थिती आहे. त्यामुळे याची जबाबदारी संबंधित अधिकाºयांवर निश्चित करायला हवी. दोन्ही महापालिका, आरटीओ, पीएमपी प्रशासनाला याबाबत काही गांभीर्य दिसत नाही. - संजय शितोळे, सचिव, पीएमपी प्रवासी मंचदरवाजे सताड उघडेपीएमपीच्या अनेक बसला स्वयंचलित दरवाजे आहेत. पण बहुतेक बसचे दरवाजे सताड उघडले असतात. दरवाजाला लटकून जाणाºया प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. दरवाजे उघडेच ठेवले जात असल्याने अपघात होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे पीएमपी प्रशासनाने हे दरवाजे बंद करण्याबाबत पावले उचलावीत.- रुपेश केसेकर, प्रवासी
ओव्हरफ्लो बसमुळे प्रवाशांचा जीव गुदमरतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 2:37 AM