- लक्ष्मण मोरेपुणे : मुलांमधील ‘स्क्रीन अॅडिक्शन’ मोठ्या प्रमाणावर वाढत चालले आहे. पालकांना प्रशिक्षित करणे, जनजागृती करणे ही काळाची गरज बनली आहे. पालकांकडून ८ ते १६ आणि १६ ते २५ या वयोगटातील मुलांबाबत सर्वाधिक तक्रारी आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राकडे नोंदविलेल्या आहेत. मागील एक महिन्यात आनंदवनच्या मनोविकास कक्षामध्ये झालेल्या ओपीडींमध्ये सर्वाधिक संख्या मुलींची आहे.सोशल मीडियाच्या अतिरेकी वापरामुळे मुलांमध्ये खोटे बोलण्याची सवय मोठ्या प्रमाणावर जडू लागली आहे. आपण जे नसतो ते दाखविण्याचीही नवी पद्धत या मुलांमध्ये रूढ होऊ लागली आहे. पालकांनी ठरविले तर या नव्या व्यसनाला आळा घालणे शक्यआहे. त्यासाठी शाळा-पालक-बालक असा त्रिकोण साधणे आवश्यकआहे.आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राकडून पालकांमधील जनजागृतीसाठी पालक कट्टा आणि मनोविकास ही संकल्पना सुरू करण्यात आली आहे. पालकांचे प्रबोधन, व्यसनमुक्ती आणि व्यसन जडूच नये, याकरिता कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली जात आहे. आजाराची लक्षणे सांगितली जात आहेत. मुळात पालकांचीच जबाबदारी वाढली आहे. त्यांना याबाबतचे गांभीर्य लक्षात आणून देणे आवश्यक आहे.मुलांचे मोबाईल तपासणे, त्यांचे सोशल मीडियावर कोणते मित्र आहेत, कोणते ग्रुप आहेत याबाबतची माहिती पालकांनी ठेवणे अत्यावश्यक बनले आहे. मुलांच्या मोबाईलमध्ये किती मोबाईल इंटरनेट डाटा असतो, त्याचा वापर किती आणि कसा होतो याविषयीचे भान बाळगणेही गरजेचे आहे. मुलांसोबतचा खुला संवादही गरजेचा आहे. आभासी विश्वाची जाणीव मुलांना करून देण्यासोबतच त्यांच्यासोबत अधिकाधिक वेळ घालविणे ही काळाची गरज बनली आहे. नातेसंबंधाबाबतचे मौलिक शिक्षणही आवश्यक आहे.सोसायटींमध्ये पालक कट्टे सुरू...आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राकडून शहरातील विविध भागांमधील सोसायट्यांमध्ये पालक कट्टे सुरू करण्यात आले आहेत. विविध संस्था, संघटना, समुपदेशक, मानसोपचारतज्ज्ञ, महिला समित्या, प्रभागस्तरीय समित्या, शाळांमधील पालक संघ यांची मदत घेतली जात आहे.सोसायटीच्या पदाधिकाºयांना भेटून संस्थेचे पदाधिकारी संकल्पना समजून सांगत आहेत. पालकांनी काय काळजी घ्यावी, त्यांच्यामध्ये जनजागृतीची असलेली आवश्यकता, मुले व्यसनाकडे आकर्षित होताहेत का, हे ओळखण्यासाठीची लक्षणे याची माहिती पालकांना दिली जात आहे.व्यसनांपासून मुलांना परावृत्त करणे हा एक भाग यामागे आहे. मात्र, मुले व्यसनाधीन होऊच नयेत, याकरिता नेमके काय करावे, याचेही प्रशिक्षण पालकांना दिले जात आहे.1 पालकांनी मनोविकास कक्षात गेल्या एक महिन्यात केलेल्या फोन कॉल्समध्ये ८ ते १६ वयोगटातील मुलांसाठी चौकशी केलेले १८७, १६ ते २५ वयोगटातील मुलांसाठी चौकशी केलेले १४० कॉल्स होते.2एक महिन्यामध्ये कक्षात घेण्यात आलेल्या ओपीडींमध्ये (बाह्य रुग्ण तपासणी) ४७ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यांपैकी २३ मुले १६ ते २५ वयोगटातील होती. तर २४ मुले ८ ते १६ या वयोगटातील होती. या ४७ रुग्णांमध्ये मुलींची संख्या ३४ आहे.आम्ही ‘स्क्रिन अॅडिक्शन’वर उपायांसाठी मनोविकास हा कक्ष सुरू केला आहे. तक्रार आणि उपचार यामध्ये संवाद हा दुवा ठरू शकतो. या ठिकाणी मुलांचे आणि तरुणांचे समुपदेशन केले जाते. रुग्णांना ३० प्रश्नांची प्रश्नावली दिली जाते. त्याच्या उत्तरांमधून रुग्णाचा कल आणि त्याचाही नेमका अंदाज येतो. गेम्स, सोशल मीडिया, पॉर्न साईट्स आदी विषयीच्या त्याच्या संकल्पना स्पष्ट होतात. आवश्यकता वाटल्यास आम्ही त्याच्यावर मानसोपचार करतो. २०२५ पर्यंत देशातील २५ टक्के जनतेला मानसोपचारांची आवश्यकता भासेल असे सध्याचे चित्र आहे. - डॉ. अजय दुधाणे, प्रमुख, आनंदवन व्यसनमुक्ती केंद्र
सोशल मीडियाचा अतिवापर : ८ ते १६ वर्षे वयोगटातील मुलांबाबत पालकांच्या तक्रारी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 2:33 AM