घोडेगाव : उगलेवाडी (ता. आंबेगाव) येथे मांडवाला आग लागून पाच जनावरे भाजली. आगीत होरपळणारी जनावरे पाहून सोडायला गेलेल्या मालक सीताराम आहुली तातळे देखील भाजले आहेत. अचानक आग लागल्याने मालक सीताराम तातळे सैरभैर झाले. मांडवामध्ये दोन खिल्लारी बैल, दोन जाफराबादी म्हशी व जर्शी गाय अशी पाच जनावरे होती. तसेच गवत, शाळू, कडबा, पेंढा भरलेला होता. आगीमध्ये हे सर्व जळून खाक झाले. गवतामुळे आगीचा भडका उडाला व यामध्ये जनावरे भाजली. जनावरांना सोडायला गेलेल्या सीताराम तातळेदेखील भाजले. ही घटना घडल्यानंतर ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली. गावकामगार तलाठी त्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला आहे. तसेच पंचायत समितीचे उपसभापती नंदा सोनावले, तंटामुक्तीचे अध्यक्ष पुरुषोत्तम फदाले, उपाध्यक्ष तुकाराम बुरुड, जिल्हा परिषद सदस्या रूपा जगदाळे, पंचायत समिती सदस्या इंदुबाई लोहकरे, दशरथ फदाले यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच या पीडिताला सरकारकडून जास्तीत जास्त मदत मिळावी, अशी मागणी तहसीलदार यांच्याकडे केली आहे.
मांडवाला आग लागून जनावरांसह मालक जखमी
By admin | Published: April 26, 2017 2:58 AM