शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

पोलीस हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन बेड उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 6:58 PM

लवळे, कंमाड हॉस्पिटलमध्ये उपचाराची सोय: वेलनेस अधिकार्‍यांची नियुक्ती

ठळक मुद्देपोलिसांना अडचण आल्यास साधा संपर्क

पुणे : कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा फटका शहर पोलीस दलाला बसला असून शहरातील २७२ पोलीस अधिकारी व कर्मचारी सध्या उपचार करण्यात येत आहे. आजाराचा हा संसर्ग लक्षात घेऊन शहर पोलीस दलाने कोविड सेलची नियुक्ती केली आहे. या सेलमध्ये सहायक पोलीस आयुक्त, एक निरीक्षक व ३ उपनिरीक्षक व अंमलदारांची नियुक्ती केली आहे. या सेल मार्फत पोलीस अधिकारी, कर्मचारी व त्यांचे कुटुंबियांशी वेळोवेळी संपर्क साधून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली जात आहे. शिवाजीनगर येथील पोलीस हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. याठिकाणी १० ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध आहेत. तसेच आणखी ऑक्सिजन सिलेंडर अ‍ॅमेझॉन कंपनीकडूनही घेण्यात येत आहे.

बाधित अधिकारी व कर्मचारी तसेच त्यांचे कुटुंबिय सर्वप्रथम शिवाजीनगर हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार केले जाणार असून त्यानंतर त्यांच्यावर आवश्यकतेनुसार सिंबायोसिस लवळे, जम्बो कोविड सेंटर, कमांड हॉस्पिटल येथे उपचार केले जाणार आहेत. पहिल्या कोविड लाटेच्यावेळी या हॉस्पिटलमध्ये पोलिसांसाठी काही बेड राखीव ठेवण्यात आले होते.  

ज्या पोलिसांची घरे छोटी असून कुटुंबातील सदस्यांची संख्या जास्त आहे व ते बाधित आहेत, अशांसाठी होम आयसोलेशयनची सुविधा वेगळ्या ठिकाणी करण्यात आली आहे. शहर पोलीस दलातील १९८० जणांची अँटीजेन तपासणी करण्यात आली असून त्यात ५२ जण बाधित आढळून आले. त्यामुळे त्यांच्यावर वेळेत उपचार करणे शक्य झाले. तसेच पोलीस दलातील ४५ वर्षापेक्षा अधिक वय असणारे १९८१ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. या लॉकडाऊनच्या काळात रस्त्यावर कर्तव्य पार पाडत असलेल्या पोलिसांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस ठाणे स्तरावर मास्क, सॅनिटायझर, पीपीई किट, ऑक्सीमीटर, मास्क शिल्ड यांचा पुरवठा करण्यात आला आहे.बाधित झालेल्या पोलिसांना रेमडेसिविर या इंजेक्शनसाठी पोलीस आयुकत अमिताभ गुप्ता यांनी स्वत: अन्न व औषध प्रशासनाशी संपर्क केल्यानंतर रेमडसिविर इंजेक्शनचा १० टक्के वाटा फ्रंटलाईन वर्कर्ससाठी राखीव ठेवण्यात आला आहे. पोलीस आयुक्त गुप्ता हे स्वत: झुम मिटिंगद्वारे बाधितांशी संपर्क साधून त्यांच्या अडीअडचणी समजून घेत आहेत व त्यांचे मनोबल वाढवित आहेत़ २०५९ बाधित पोलीस

शहर पोलीस दलात पहिल्या पोलीस अंमलदारांना १६ एप्रिल २०२० रोजी कोरोना संसर्ग झाला होता. तेव्हापासून आतापर्यंत २ हजार ५९ पोलीस बाधित झाले आहेत. सध्या २७२ पोलीस अधिकारी व अंमलदारांवर उपचार करण्यात येत आहे. या काळात १ पोलीस अधिकारी व १२ पोलीस अंमलदार यांचे निधन झाले आहे. पोलिसांना अडचण आल्यास साधा संपर्क

सहायक पोलीस आयुक्त सुनिल यादव - ९९२३४६१९५५, पोलीस निरीक्षक विजय पुराणिक - ९८२३२२६१४५, पोलीस उपनिरीक्षक गौरव देव - ९५११२०००६६, सुशिल डमरे - ८८८८८५७४२४, सुमषा मोरे ८८०५०००८२१़

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्याGovernmentसरकार