कोरोनाच्या संसर्गानंतर रुग्णांना ऑक्सिजनची नितांत गरज भासते, ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात असे ऑक्सिजन क्वांसेनट्रेट असणे गरजेचे असते. पुरंदर तालुक्यातील काही उपकेंद्रांना पुरंदर शिक्षक समिती, जॉन डिअर इंडिया प्रा ली.अँड युनायटेड ऑर्गनायझेशन, सी. वाय. डी. ए. संस्था पुणे यांचे वतीने असे ऑक्सिजन क्वांसेनट्रेट यंत्र भेट देण्यात आले.
गुळुंचे येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राला शुक्रवारी जवळपास सव्वा लाख किंमतीचे व १० लिटर क्षमतेचे ऑक्सिजन क्वांसेनट्रेट शिक्षक समितीचे अध्यक्ष अनिल चाचर यांच्या सहकार्यातून शिक्षक नेते यशवंत दगडे, गणेश कामठे, दीपक आधटराव, सुरेश जगताप, सुनील लोणकर, संदीप कदम यांच्या उपस्थितीत ऑक्सिजन क्वांसेनट्रेट यंत्र नीरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अक्षय म्हवाण, आरोग्यसेवक बाळासाहेब भांडलकर यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सदस्य कांचन निगडे, पुरंदर तालुका उपाध्यक्षा कोमल निगडे, भैरवनाथ सोसायटीचे चेअरमन विलास निगडे आदी उपस्थित होते.