रोटरी क्लब नारायणगाव हायवे व रोटरी क्लब गांधी भवन व डॉ. कथे डायग्नोस्टिक सेंटर यांनी केलेल्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करून भविष्यकाळात असेच योगदान द्याल, अशी अपेक्षा आ. बेनके यांनी व्यक्त केली.
या वेळी रोटरी क्लब नारायणगाव हायवेचे अध्यक्ष अंबादास वामन, रोटरी क्लब गांधीभवनचे अध्यक्ष शशांक सप्रे व शिवनेरी भूषण डॉ. सदानंद राऊत यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन श्रीकांत फुलसुंदर यांनी, तर डॉ. योगेश आगम यांनी आभार मानले. जीव धोक्यात घालून कोविड सेंटरमध्ये अविरतपणे काम करणारे संजय भोर यांचा विशेष सत्कार करण्यात आला व डॉ. कथे यांच्या वतीने कोरोना कालखंडात भोर यांना मासिक ३ हजार रुपये मानधन व त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांच्या सर्व प्रकारच्या टेस्ट विनामूल्य करण्यात येतील असे कथे यांनी जाहीर केले.
ग्रामीण रुग्णालय नारायणगाव येथील कोविड सेंटरला रोटरी क्लब व डॉ. कथे डायग्नोस्टिककडून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, आरोग्य साहित्य देण्यात आले. या वेळी विविध मान्यवर.