५५ बेड ची क्षमता असून ५१ रूग्ण तेथे ऊपचार घेत आहेत. तेथे १२
व्हेंटिलेटर आहेत. व्हेंटिलेटर शिवाय मास्क व्दारे हि ऑक्सीजन देण्यात
येत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. द्रवरूप ऑक्सीजनचे सिलेंडर त्याला
डयुरा म्हणतात तो क्युबिक मधे मोजला जातो . एक टाकी २३२ क्युबिकची
असते. या टाकीचे वजन १०० कीलो पेक्षा जास्त असल्याने व हवेशी संपर्क
आल्यानंतर त्याचा वायू तयार असल्याने तो सिलेंडर तळमजल्यावर ठेऊन
भिंतीतील पाईपने वर नेला जातो व रूग्णाला पुरविला जातो.
इतर ऑक्सीजन सिलेंडर ४० लिटरचे असतात त्यामधे ऑक्सीजन
तयार असतो हा सिलेंडर रूग्णाजवळ हि ठेवता येतो. दोन्ही ऑक्सीजन
सिलेंडरचा खुप तुटवडा असून मिळेल तो सिलेंडर अथवा इतर हॉस्पिटल
कडून आणून आम्ही करत असल्याची माहीती डॉ सॅम्युअल कांबळे यांनी
यावेळी बोलताना दिली.
एम्स हॉस्पिटलमधे ६ व्हेंटिलेटर असून ऑक्सीजन पुरवठा
सुरळित असल्याची माहीती मिळाली.