पुणे : हिमाचल प्रदेशातील मनालीच्या आसपासच्या गावांमधून चरसची लागवड केली जाते. तेथून हा माल सायलेन्समधून दिल्लीपर्यंत आणला जातो. दिल्लीतून रेल्वेमागे संपूर्ण देशभरात पोहचवला जातो. या चरसचा प्रवास पोलीस अधीक्षक सदानंद वायसे पाटील यांनी उलघडला.
हिमाचल प्रदेशातील मनाली येथून ४० किमी दूर असलेल्या मनाला गावातून हा माल रसेल, कुलु, तोश, झलांममार्गे कसोल येथे येतो. तेथे या मालाची पॅकिंग होते. दुचाकीला दोन सायलेन्सर असतात. त्यातील एका रिकाम्या सायलेन्सरमध्ये हा माल भरला जातो. तेथून तो दिल्लीला आणण्यात येतो. तेथे सायलेन्सर फोडला जातो. तो दिल्लीतून रेल्वेने देशभरात पाठविला जातो. पुण्यात हा कोणाला माल द्यायचा याची माल घेऊन येणार्यांना माहिती नसते. ते ठरलेल्या ठिकाणी पोहचल्यानंतर ते संबंधितांना कळवितात. पण ते प्रमुख पुण्यात माल पोहचला आहे, हे माल घेणार्यांना सांगतात. त्यानंतर त्यांची खात्री पटल्यानंतर ते संबंधितांना भेटून मालाची डिलिव्हरी करतात. ललितकुमार हा मुख्य सुत्रधार असून तो यापूर्वी अनेकदा पुण्यात आल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.
या अमली पदार्थाचा माग करण्यासाठी गेली १ महिना ४ पोलीस अधिकारी प्रयत्नशील होते. त्यातूनही गुप्त बातमीदारामार्फत ही माहिती पोलिसांना मिळाली.
मुंबईत ४ ठिकाणी जाणार होता माल
पुण्यात आलेल्या या मालापैकी २२ किलो मुंबईतील ४ ठिकाणी जाणार होता. त्यानंतर तो अन्य ठिकाणी जाणार होता. त्याचा तपास मुंबई पोलीस व नायकोटिस ब्युरोमार्फत करण्यात येत आहे.
* हा चरस एका विशिष्ठ पद्धतीने ते पॅकिंग केले जाते. त्यामुळे सेन्सर टेक्नॉलॉजीला हे पॅकिंग चकवा देते. स्कॅनरमध्ये तपासणी केले तर या पॅकेटमध्ये चरस असल्याचे दिसून येत नाही, असे सदानंद वायसे पाटील यांनी सांगितले.