शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

तळीरामांच्या डोक्यात पडेना प्रकाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 2:51 AM

पोलिसांकडून कठोर कारवाई; उजेडाच्या पुढे अंधारात पुन्हा मद्यपींच्या पार्ट्या

वानवडी : भागात केदारीनगर येथील संविधान चौकाच्या येथे काकडे मैदान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोकळ्या जागेत रात्री मद्यपी दारू पित पार्ट्या करत बसलेले असतात. त्यावर वचक म्हणून त्या ठिकाणी दिवे बसवण्यात आले आहेत; परंतु दिवे लागले तरी तळीरामांच्या डोक्यात काही प्रकाश पडेना अशी गत झाली आहे.‘वानवडीतील मोकळे मैदान तळीरामांसाठी बनले बार’ हे वृत्त 'लोकमत'ने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर वानवडी पोलिसांनी मद्यपींवर कारवाई केली तसेच सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारचे कृत्य होत असताना नगरसेविका कालिंदा पुंडे यांनी याची दखल घेत मैदानात प्रकाश पडेल असे मैदानाच्या बाजूने असलेले विद्युतदिवे सुरू केले.मैदानात दिव्यांचा प्रकाश तर पडला; परंतु मैदानात ज्या भागापर्यंत उजेड आहे, त्याच्या पुढे अंधारात आता मद्यपींनी आपल्या दारूच्या पार्ट्या पुन्हा सुरू केल्या आहेत. हवेशीर असलेल्या या मोकळ्या मैदानात अंधाराचा फायदा घेत मद्यपी वानवडी परिसरातील वाईनच्या दुकानातून दारू विकत आणून अंधारात दारू पित पार्टी करत बसलेले असतात. अशातच मोकळी हवा घेण्यासाठी व फेरफटका मारायला आलेल्या नागरिकांना या तळीरामांचा पुन्हा त्रास सहन करावा लागत आहे.केदारीनगर येथे संविधान चौकात जवळपास २० एकरइतकी खासगी मालकीची मोकळी जागा असून, जागेभोवती चारही बाजूने रस्ते असल्याने रस्त्याच्या कडेला पादचाºयांसाठी फिरण्यासाठी पदपथ आहेत. मोकळी जागा असल्याने या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, महिला मोकळी व स्वच्छ हवा मिळवण्यासाठी सकाळ, संध्याकाळ व रात्री वॉकिंगसाठी तसेच फिरण्यासाठी येत असतात. त्यामुळे या चौकाला चौपाटीसारखे स्वरूप आले आहे.या मोकळ्या जागेत अर्ध्या भागात झाडेझुडपे आहेत, तर अर्धी जागा ही मोकळी असून, त्या जागी सकाळी-संध्याकाळी ज्येष्ठ नागरिक, युवक, महिला व्यायाम, योगा करत असतात, तर मुले खेळत असतात.केदारीनगर येथील मोकळी जागा असलेल्या काकडे मैदानात विद्युतदिवे लागले असले तरी अंधाराचा आडोसा घेऊन दारू पित पार्ट्या करणाºयांवर महाराष्ट्र पोलीस अ‍ॅक्टच्या कलम ११०, ११७ नुसार आत्तापर्यंत ९० ते १०० वेळा कारवाई करण्यात आली असून, पकडण्यात आलेल्या मद्यपींवर कोर्टाकडून दंड ठोठावण्यात आला आहे. तरीही यापुढे हीच कारवाई कठोर करून पेट्रोलिंग वाढविले जाईल, तसेच या ठिकाणी ज्यांच्यावर कारवाई केली आहे, ते मद्यपी येथे न बसता दर वेळी वेगवेगळ्या व्यक्ती येथे दारूपित बसताना आढळल्या आहेत.- विकास राऊत, सहायक पोलीस निरीक्षक, वानवडी

टॅग्स :Puneपुणे