सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे ५० टक्के विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश देण्यात आला.
कला, वाणिज्य, विज्ञान व संगणक विभागातील एकूण २३० विद्यार्थी महाविद्यालयात हजर होते. प्राचार्य डॉ. आर. के. अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विद्यार्थ्यांना कोरोना नियमावली संदर्भातील सूचना देण्यात आल्या. आरोग्यविषयक सर्व बंधने पाळून विद्यार्थ्यांनी महाविद्यालय परिसरात अध्ययन करावे, असे आवाहन करण्यात आले. महाविद्यालयातील कला शाखेचे प्रमुख डॉ. समीर आबनावे, वाणिज्य शाखेच्या प्राध्यापक सुजाता गायकवाड, विज्ञान शाखेचे प्रमुख डॉ. अविनाश बोरकर, संगणक विभागाचे प्रमुख प्राध्यापक नंदकिशोर मेटे, प्रसिद्धी विभागप्रमुख विजय कानकाटे व इतर सर्व प्राध्यापकांचे सहकार्य लाभले.
प्रत्येक विद्याशाखेच्या वर्गाप्रमाणे प्राध्यापकांची नियुक्ती करून प्रत्येक विद्यार्थ्याचे थर्मल मीटर, ऑक्सिमीटरच्या माध्यमातून शरीराचे तापमान व ऑक्सिजनची पातळी मोजून त्याची नोंद करून विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश देण्यात आला. विज्ञान आणि संगणक शाखेतील विद्यार्थ्यांना प्रामुख्याने प्रात्यक्षिक कामासाठी बोलविण्यात आले. तसेच कला व वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांसाठी प्राध्यापकांची व्याख्याने आयोजित केली गेली. विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे शिस्तीचे पालन करून सहकार्य केले या सर्व नियोजनात प्राध्यापकांचे व शिक्षकेतर सेवकांच्या मोलाचे योगदान मिळाले असे प्राचार्य डॉ. अडसूळ यांनी सांगितले.
फोटो ओळ :- डॉ. मणिभाई देसाई कॉलेजमध्ये प्रवेश करताना विद्यार्थ्यांची तपासणी करताना प्राचार्य व प्राध्यापक.