येथील महालक्ष्मी मंदिरात दरवर्षी पाडवावाचन करण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे. पोलीस पाटील आत्माराम डुंबरे यांच्या हस्ते विधिवत पंचांग पूजन करण्यात आले. ग्रामपुरोहित नंदूकाका भदे यांनी आकड पूजा करून पंचागवाचन केले. पाऊस चांगला पडून,धनधान्य विपुल होईल,दूधदुभते वाढेल. कापड, फळे, ऊस, चंदन व सोने विपुल मिळतील व लोकांची संपत्ती वाढेल. निरसाचा अधिपती मंगळ असल्याने पोवळे, तांबडे कापड, यांच्या किमती वाढतील. मेघनिवास परटाच्या घरी पाऊस चांगला राहील. नद्या व पर्वत यावर चार भाग भूमीवर पाऊस पडेल, असे ग्रामपुरोहित यांनी पंचागवरून भाकीत केले. पंचांग वाचून झाल्यावर नववर्षाच्या रामदास बोत्रे यांनी शुभेच्छा दिल्या व महालक्ष्मीदेवीची पालखी व यात्रेचे नियोजनाबाबत चर्चा झाली. या वेळी उपस्थित सरपंच संभाजी घारे, उपसरपंच राहुल कदम, मारुती बोत्रे,ग्रामपंचायत सदस्य अनिल नेटके, रमेश होरे, रामदास बोत्रे,खंडू गावडे, बंटी साबळे, रवी कान्हूरकर, दत्तात्रय हारदे उपस्थित होते.
दावडी-महालक्ष्मी मंदिरात पाडवावाचन करण्यात आले व पंचांगाचे पूजन करताना पोलीस पाटील आत्माराम डुंबरे व ग्रामपुरोहित भदे.