शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
2
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
3
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
4
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
5
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
6
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
7
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
8
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
9
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
10
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
11
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
13
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
14
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
15
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
16
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
17
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
19
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
20
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान

पॅरिसला जाण्यासाठी तेलतुंबडेंना विद्यापीठाने पैसे दिले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 7:38 PM

डॉ. तेलतुंबडे यांना एप्रिल २०१८ मध्ये पॅरिसला जाण्यासाठी माओवादी संघटनेने ७ ते १० लाख रुपये मदत केल्याचे नमूद करण्यात आलेला एक मेल पोलिसांना मिळाला आहे.

पुणे : प्रा. डॉ. आनंद तेलतुंबडे हे नामांकित प्राध्यापक असून ते अमेरिकन विद्यापीठाच्या निमंत्रणावरुन पॅरिसला गेले होते आणि विद्यापीठानेच त्यांचा जाणे-येण्याचा खर्च केला होता. या दौ-याचा माओवाद्यांशी कोणताही संबंध नसल्याचा युक्तिवाद बचाव पक्षाचे वकील रोहन नहार यांनी विशेष न्यायाधीश किशोर वढणे यांच्या न्यायालयात बुधवारी केला.     डॉ. तेलतुंबडे यांना एप्रिल २०१८ मध्ये पॅरिसला जाण्यासाठी माओवादी संघटनेने ७ ते १० लाख रुपये मदत केल्याचे नमूद करण्यात आलेला एक मेल पोलिसांना मिळाला आहे. मात्र, डॉ. तेलतुंबडे यांचे बंदी घालण्यात आलेल्या माओवादी संघटनेच्या नेत्यांशी संपर्क असल्याचा उल्लेख केवळ पोलिसांनीन्यायालयात दाखल केलेल्या पाच पत्रात आहे, त्याशिवाय कोणताही ठोस पुरावा पोलीसांकडे नाही. संबंधित पत्र संशयित अटक करण्यात आलेल्या व्यक्तींच्या लॅपटॉपमधून मिळाल्याचा दावा पोलीस करीत असून सदर पत्र बनावट आहे, असेही अ‍ॅड. नहार यांनी न्यायालयास सांगितले.         नहार म्हणाले, एल्गार परिषदे संदर्भात पोलिसांनी ऑगस्ट महिन्यात मुंबईत पत्रकार परिषद घेऊन काही पत्र प्रसारमाध्यमांसमोर जाहीर केली. एखाद्या गंभीर प्रकरणाचा तपास करताना अशाप्रकारे कृत्य करणे योग्य नाही. नागपूर येथील प्रा. शोमा सेन यांच्या लॅपटॉपमध्ये २०१७ मध्ये तेलतुंबडे पॅरिसला जाण्याचा ईमेल संदर्भ मिळाला आहे. त्यामध्ये त्यांनी पॅरिस परिषदेत जाऊन कोरेगाव-भीमा विषयाची आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडणी करून विषय ज्वलंत ठेवावा, असे सांगितल्याचे नमूद आहे. प्रत्यक्षात कोरेगाव भिमाची घटना एक जानेवारी रोजी घडली असल्याने संबंधित ईमेल बनावट आहे. मूळ तक्रार ही एल्गार परिषदेची असताना त्यात कोरेगाव भीमाच्या माध्यमातून अन्य गोष्टींचा समावेश तपासात केला जात आहे. या प्रकरणात दहशतवादी कृत्य असल्याचे सांगत युएपीए कलम अंतर्भूत करण्यात आले आहे, मात्र असा कोणताही प्रकार घडलेला नसल्याने सदर कलम लावण्याची गरज नव्हती. तेलतुंबडे यांच्यावर अन्य कोणत्याही प्रकारचे आरोप झालेले नाहीत. जर पोलिसांना त्यांच्याकडे पैशांच्या देवाणीघेवाणीसाठी तपास करावयाचा असेल तर त्यांनी ती माहिती बँकेकडून मिळू शकते. तेलतुंबडे यांना नमेकी कशासाठी अटक करावयाची आहे आणि त्यांच्याकडे कोणत्या गोष्टीची चौकशी करावयाची आहे, याबाबत पोलिसांनी अद्याप भूमिका जाहीर केली नाही. तेलतुंबडे चौकशीसाठी हजर राहू शकतात मात्र, पोलिसांनी त्यांना नोटीस दिलेली नाही. या संदर्भात जिल्हा सरकारी वकील उज्वला पवार या गुरुवारी आपली बाजू न्यायालयासमोर मांडणार आहे. 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCourtन्यायालय