पुणे : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे पुण्यावर विशेष प्रेम होते. त्यांना पुण्यात यायला आवडायचे. पुण्याशी त्यांचे एक वेगळेच नाते जुडले होते. या व अशा विविध आठवणींना सर्वपक्षीय नेत्यांनी उजाळा दिला व श्रद्धांजली वाहण्यात आली.पुणेकर नागरिक आणि पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने रविवारी (दि. १९) बालगंधर्व रंगमंदिर येथे वाजपेयी यांच्या श्रद्धांजली सभेचे आयोजन केले होते. या वेळी महापौर मुक्ता टिळक, पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, आमदार नीलम गोºहे, भीमराव तापकीर, शरद रणपिसे, कुलगुरू नितीन करमळकर, माजी मंत्री रमेश बागवे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चेतन तुपे, उद्योजक अभय फिरोदिया, चंद्रकांत मोकाटे, अशोक कांबळे, अजय शिंदे, न. म. जोशी, पंडित वसंतराव गाडगीळ, विद्याधर अनास्कर, राहुल सोलापूरकर, प्रदीप रावत, श्रीकांत आचार्य, सर्व पक्षांचे नेते, विविध क्षेत्रांतील व्यक्ती उपस्थित होते.अटलजींच्या जीवनातून, कार्यातून प्रत्येक गोष्ट शिकण्यासारखी होती. विरोधकांमधील चांगले गुण लक्षात घेऊन त्यांनी अनेकांना संधी दिली. जनसामान्यावरील पकड होती व प्रचंड दूरदृष्टी असलेला हा नेता होता. पुणे शहराचा, देशाचा विकास करण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन चालले पाहिजे, असे चेतन तुपे यांनी सांगितले. राजेंद्र पाटील प्रास्ताविकामध्ये यांनी एक पत्रकार देशाचा पंतप्रधान होतो, ही आम्हा सर्व पत्रकारांना अभिमानाची गोष्ट असल्याचे सांगितले. या वेळी अनेक मान्यवरांनी अटलजींना श्रद्धांंजली वाहीली.पुण्याविषयी अटलजींच्या अनेक आठवणीगिरीश बापट म्हणाले, पुण्याविषयी अटलजींच्या मनात विशेष प्रेम होते. त्यामुळे पुण्यात येण्यासाठी ते नेहमीच उत्साही असत. ही व्यक्ती नव्हती एक प्रवृत्ती होती. त्यांनी लाखो लोकांना प्रेरणा दिली. अटलजी आपल्यात नसले तरी त्यांच्या कविता, कार्यामुळे अजरामर राहतील. त्यांनी पाहिलेले प्रगत देशांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे.देशाची लोकशाही टिकली पाहिजे यासाठी सतत प्रयत्न करू, हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल. दिलीप कांबळे यांनी अटलजी, आडवाणी, प्रमोद महाजन राजकारणातील आदर्श असून, त्यांनी दिलेला गुरुमंत्र, शिकवणूक राजकीय जीवनात खूप उपयोगी ठरत असल्याचे सांगितले. अनिल शिरोळे यांनी विकसित, प्रगत भारताचे अटलजींचे स्वप्न साकारण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.नीलम गोºहे यांनी सांगितले, की हिंदुस्थानची गरिमा जगासमोर नेणारा नेता म्हणून अटलजींची प्रतिमा आहे. राजकीय कारकिर्दीत आलेल्या सर्व संकटांवर त्यांनी केलेली मात सर्वांना शिकण्यासारखी आहे.स्त्रियांचे गृहिणी म्हणून असलेले महत्त्व अटलजींमुळे देशाच्या जनगणनेत पहिल्यांदा नोंदविण्यात आले. त्यांच्या कार्याचे स्मरण ठेवून तसे काम केल्यास खरी श्रद्धांजली ठरेल.
पुणेकरांकडून अटलजींना श्रद्धांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 2:37 AM