मेजर प्रदीप ताथवडे यांना १७ जून २००० रोजी अतिरेक्यांशी लढताना वीरमरण आले असून अशा देशप्रेमी सुपुत्राच्या जयंतीदिनी घेतलेल्या चित्रकला स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये मातृभूमीच्या रक्षणासाठी स्वतःच्या कर्तृत्वाने अमर झालेल्या महान वीरपुरुषाचा परिचय होण्यास मदत झाली आहे. स्पर्धेत पाचवी ते सातवी गटातून आयुष संतोष थिटे - प्रथम, प्रेम चंद्रकांत लिमगुडे - द्वितीय, समाधान बाळासो सुक्रे - तृतीय व आर्यन जयसिंग साकोरे उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला. आठवी ते दहावी गटातून अंकिता कैलास ताठे - प्रथम, श्रीधर ज्ञानेश्वर पऱ्हाड - द्वितीय, स्नेहल शहाजी कानडे - तृतीय व प्रतीक्षा बाजीराव भोसुरे - उत्तेजनार्थ क्रमांक मिळवत यश संपादन केले.
विजेत्या स्पर्धकांना मेजर प्रदीप ताथवडे यांच्या जयंतीदिनी मिलिंद ताथवडे यांच्या हस्ते रोख रक्कम, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला. यशस्वी विद्यार्थ्यांचे गावातील पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले. चित्रकला स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व नियोजन कलाशिक्षक एस. एस. जोहरे यांनी केले. पी.सी. शिर्के व आर.एस. उघडे यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन सी. आर. थिटे तर एस. के. जोंधळे यांनी आभार मानले.
फोटो ओळ : चित्रकला स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.