पुणे : प्रदुषणाच्या अावरणातून बाहेर निसर्ग साैंदर्य पाहणारा तरुण, प्लॅस्टिकच्या विळख्यात अडकलेले मासे, प्रदूषणाने व्यापलेलं शहर, पृथ्वीकडे चारही बाजूंनी येणारं प्लॅस्टिक अश्या शंभरहून अधिक प्रदूषणाची दाहकता अधाेरेखित करणाऱ्या चित्रांचे प्रदर्शन पुण्यातील बालगंधर्व कलादालनात भरविण्यात अाले अाहे. बिइंग व्हाॅलेंटिअर या संस्थेतर्फे हे प्रदर्शन भरविण्यात अाले अाहे. अतुल वाघ यांनी ही चित्रे रेखाटली अाहेत.
अाज जागतिक पर्यावरण दिन अाहे. वाढत्या शहरीकरणामुळे प्रदुषणात माेठ्याप्रमाणावर वाढ झाली अाहे. माेठ्या शहरांमधील नागरिकांचे अाराेग्य याने धाेक्यात अाले अाहे. त्यातही प्लॅस्टिकच्या कचऱ्याचे विघटन हाेत नसल्याने या कचऱ्याची माेठी हानी निसर्गाला हाेत असते. नद्या, नाले, समुद्र यांमध्ये प्लॅस्टिकचा कचरा टाकला जाताे. या कचऱ्यामुळे चलचरांचे अस्तित्व धाेक्यात अाले अाहे. त्यातच बेसुमार वृक्षताेडीमुळे हवेच्या प्रदूषणात वाढ झाली अाहे. या सगळ्याची दाहकता चित्रांमधून मांडण्याचा प्रयत्न अतुल वाघ यांनी केला अाहे. या चित्रांबराेबर प्रदूषणामुळे नदी, समुद्राचे बदललेले स्वरुप, जलचरांचे धाेक्यात अालेले अस्तित्व यावरही फाेटाेंच्या माध्यमातून भाष्य करण्यात अाले अाहे. केवळ प्रदुषणाबद्दल बाेलण्यापेक्षा त्यावर उपायही सांगायला हवेत या हेतून याठिकाणी विविध प्रयाेग तसेच टाकावू पासून तयार केलेल्या वस्तू ठेवण्यात अाल्या अाहेत. त्याचबराेबर एखाद्या टाकावू वस्तूला वेगळ्या प्रकारे सजविल्यास त्याचा किती चांगला वापर करता येऊ शकताे हे दाखविणारे अनेक फाेटाेही या ठिकाणी लावण्यात अाले अाहेत.
गेल्या चार वर्षांपासून विविध विषयांवरील चित्रांचे प्रदर्शन बिइंग व्हाॅलेंटिअर या संस्थेतर्फे भरविण्यात येते. यंदा प्रदूषण त्यातही प्लाॅस्टिकमुळे हाेणारे पाण्याचे प्रदूषण यावर भर देण्यात अाला हाेता. नागरिकांकडून समुद्रात टाकण्यात येणाऱ्या प्लॅस्टिकमुळे जलचरांचे काय हाल हाेतात याचा अनुभव देण्यासाठी या प्रदर्षणात वरच्या भागात जाळी लावण्यात अाली असून त्यावर प्लॅस्टिक अंथरण्यात अाले अाहे. जेणेकरुन प्लॅस्टिकची भीषणता नागरिकांना अनुभवता यावी. याविषयी बाेलताना अतुल वाघ म्हणाले, दरवर्षी वेगवेगळे विषय घेईन प्रदर्शन भरविण्यात येते. यंदा हॅशटॅग बीट प्लॅस्टिक पाेल्युशन हा विषय घेण्यात अाला अाहे. प्रदूषणाचे गंभीर परिणाम दाखवत असतानाच त्यावरील उपायही या प्रदर्शनाच्या माध्यमातून सांगण्यात अाले अाहेत. त्याचबराेबर विविध सामाजिक संस्था पर्यावरणाबाबत करत असलेल्या कामांची माहिती देणारे फाेटाेही लावण्यात अाले अाहेत. या माध्यमातून पर्यावरण रक्षणासाठी एक चळवळ उभी राहत असून अनेक तरुण जाेडले जात अाहेत.
व्हिडअाे पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://m.facebook.com/story.php?story_fbid=1782615941804925&id=132309676835568