पुणे : पाकिस्तानशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्तापित करण्यासाठी नेहमी भारताने पहिले पाऊल पुढे टाकले आहे. मात्र, त्या बदल्यात भारताला नेहमी विश्वासघात मिळाला आहे. या पुढे जर पाकिस्तानला भारतासोबत मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करायचे असतील तर त्यांनी एक पाऊल पुढे येणे गरजेचे असून यासोबतच स्वत:ला ‘इस्लामिक' राष्ट्र न म्हणवता, धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून ओळख निर्माण करावी, असा उपरोधिक टोला लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी पाकिस्तानला लगावला. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील १३५ व्या तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा शुक्रवारी उत्साहात पार पडला. या कार्यक्रमानंतर आयोजित पत्रकार परिषदेत रावत बोलत होते. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानातील कर्तारपूर कॉरिडॉरच्या उद्घाटनाप्रसंगी भारताशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्तापित व्हावे अशी इच्छा असल्याचे व्यक्त केले. या साठी भारताने पहिले पाऊल टाकावे अशी अपेक्षा व्यक्त करत असे झाल्यास आम्ही दोन पावले टाकू असे विधान केले होते. या बाबत त्यांना प्रश्न विचारला असता रावत म्हणाले, आतापर्यंत भारताने पाकिस्तान सोबत कायम सौदाहार्याची भावना ठेवली आहे. दोन्ही देशात मैत्रीपूर्ण संबंध प्रस्तापित करण्यासाठी एक पाऊन पुढे येऊन भारताने पुढाकार घेतला आहे. भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. मात्र, पाकिस्तान स्वत:ला इस्लामिक राष्ट्र म्हणवते. अधिका-यांना या तंत्रज्ञानाची माहिती व्हावी यासाठी प्रबोधिनीत हे नवे तंत्र तसेच शस्त्रास्त्रे आणली जात आहे. प्रबोधिनीतील विद्यार्थ्यांना नव्या तंत्रज्ञानाची ओळख व्हावी यासाठी नवा बीटेक अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे, असेही रावत म्हणाले. .......................सैन्यदलात महिलांना कायमस्वरूपीपदे देण्यासाठी प्रयत्नशील सैन्यदलात महिलांना कायमस्वरूपी पणे देता येईल का याचा विचा सुरू आहे. यासाठी आम्ही प्रयत्नशिल आहोत. प्रत्यक्ष युद्धभीमीवर महिलांना नियुक्त करणे सद्यस्थितीत शक्य नाही. मात्र, मानसशास्त्र, भाषा अनुवादक, लेखापाल, माहिती तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रांत महिला चांगले काम करू शकतात. या साठी महिला अधिका-यांचा विचार होत आहे. लवकरच याबाबत महत्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. सैन्य दलातील बरेचसे जवान हे ग्रामीण भागातून आलेले आहेत. त्यामुळे शहरी भागातील नागरिकांप्रमाणे महिलांसोबत काम करण्याची मानसिकता अजून त्यांच्यामध्ये नाही. त्यामुळेच प्रत्यक्ष युद्धभूमीवर महिलांची नियुक्ती नाही, असेही रावत यांनी स्पष्ट केले. ......................
मैत्रीपूर्ण संबंधासाठी पाकिस्तानने धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनावे : लष्कर प्रमुख बिपिन रावत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2018 6:17 PM
मैत्रीपूर्ण संबंध प्रस्तापित करण्यासाठी नेहमी भारताने पहिले पाऊल पुढे टाकले आहे. मात्र, त्या बदल्यात भारताला नेहमी विश्वासघात मिळाला आहे.
ठळक मुद्देराष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा १३५ दीक्षांत संचलन सोहळा प्रबोधिनीतील विद्यार्थ्यांना नव्या तंत्रज्ञानाची ओळख व्हावी यासाठी नवा बीटेक अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार सैन्यदलात महिलांना कायमस्वरूपी पदे देण्यासाठी प्रयत्नशील