शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
2
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
4
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
6
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
7
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
8
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
9
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
10
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
11
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
12
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
13
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
14
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
15
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
16
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
17
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
18
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
19
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
20
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला

माऊलींचा पालखी सोहळा सातारा जिल्ह्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 1:53 AM

आळंदीतून निघाल्यानंतर आजोळघरातील मुक्कामासह ७ मुक्काम करीत शुक्रवारी माऊलींच्या पालखी सोहळ्याने सातारा जिल्ह्यात प्रवेश केला.

नीरा : आळंदीतून निघाल्यानंतर आजोळघरातील मुक्कामासह ७ मुक्काम करीत शुक्रवारी माऊलींच्या पालखी सोहळ्याने सातारा जिल्ह्यात प्रवेश केला. रिमझिम पाऊसाच्या सरी अंगावर झेलत वारक-यांनी माऊलींना नीरास्नान घालून पुणेकरांचा निरोप घेतला.संत ज्ञानदेवांच्या पालखी सोहळ्यास नीरा नदीच्या पैलतीरावर सातारा जिल्हा प्रशासन स्वागतासाठी व निरोप देण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासन उभे राहिले होते. पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, दौंड-पुरंदरचे प्रांताधिकारी संजय आसवले, तहसिलदार सचिन गिरी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे, पुणे ग्रामीण पोलीस उपअधीक्षक तेजस्वी सातपूते, भोर उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब जाधव, जेजूरीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने, उपनिरीक्षक राजेश माळेगावे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभय तिडके, मनोज खोमणे, पुरंदर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. श्रीकृष्ण विणेकर, महावितरण आदी यंत्रणांचे पदाधिकारी व शासकीय अधिकारी पुणे जिल्ह्यातील भाविकांनी माऊलींच्या सोहळ्यास नीरा स्नानानंतर भावपूर्ण निरोप दिला.अत्यंत भक्तिमय वातावरणात या सोहळ्याचे पुणे व सातारा जिल्ह्याच्या सीमेवरील पाडेगाव येथे उत्साहात स्वागत करण्यात आले. साताऱ्याच्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, सातारा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, आमदार मकरंद पाटील, वाईचे प्रांताधिकारी अस्मिता मोरे, सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, जि. प. सदस्य दिपाली साळूंखे, खंडाळा पंचायत समितीचे सभापती मकरंद मोटे, गटविकास अधिकारी दिपा बापट, मुख्ययकारी अधिकारी नितीन थाडे, खंडाळ्याचे तहसीलदार विवेक जाधव, आदी विविध पदाधिकारी, अधिकारी व सातारा जिल्ह्यातील भाविकांनी मोठ्या उत्साही वातावरणात स्वागत केले.सोहळ्याच्या स्वागतासाठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. श्रीकृष्ण विणेकर, पंचायत सदस्य गोरखनाथ माने, सरपंच दिव्या पवार, उपसरपंच बाळासाहेब भोसले, विराज काकडे, रेखा चव्हाण, दत्ता चव्हाण, लक्ष्मण चव्हाण, राजेश काकडे, चंद्रराव धायगुडे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष किरण जेधे, ग्रामपंचायत सदस्य राजेश चव्हाण, दिपक काकडे, अनिल चव्हाण, ग्रामसेवक सुभाष लिंबरकर व परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्वागत केले.नीरास्नानाचा भक्तिपूर्ण सोहळा१माउलींच्या पालखी सोहळ्यात नीरास्नानाचा अनन्यसाधारण महत्त्व आहे. पुर्वी हा सोहळा पुण्याहून शिरवळ मार्गे लोणंदला जात असे. त्यामुळे सासवड, जेजुरी, वाल्हा, नीरा परीसरातील भावीकांना माऊलींच्या दर्शनाचा लाभ मिळत नसे.२ब्रिटिश काळात वाल्हा गावचे कृष्णा मांडके या अभियंत्याने नीरा नदीवर स्वखचार्ने पुल बांधला. त्यामुळे हा पालखी सोहळा जेजुरी-नीरामार्गे पंढरपूरला जाऊ लागला. पालखी सोहळ्यात इंद्रायणी, नीरा व चंद्रभागा तीरावरील स्नानाला अधिक महत्त्व आहे.३सोहळा पंढरीकडे प्रस्थान ठेवत असताना माऊलींच्या पादूकांना इंद्रायणीच्या पवित्र तिर्थात स्नान घालण्यात येते. त्यानंतर पालखी सोहळ्यातील अर्धा टप्पा पुर्ण झाल्यावर सातारा जिल्ह्यात प्रवेशापुर्वी नीरा नदीच्या प्रसिद्ध दत्त घाटावरील पवित्र तिर्थातस्नान घालण्यात येते.४यंदा दिवे घाट ते नीरा नदीपर्यंतच्या मार्गावर व्यावसायिकांनी प्रचंड गर्दी केली होती. त्यामुळे पालखी रथ प्रत्येक ठिकाणी उशिरा पोचत होता. पोलीसांनी रस्त्यावरील अतिक्रमणे काढली पण सोहळ्या बरोबर आलेल्या व्यावसायिकांनी रस्ता अरुंद केला होता. पुढील काळात सोहळा मुक्कामाच्या ठिकाणीच व्यावसायिकांची व्यवस्था करावी. अशी अपेक्षा सोहळा वाहतूक प्रमूख पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.पुरंदरच्याप्रशासनाचे कौतुकमाउलींच्या पालखी सोहळ्याने दिवे घाट पार करून पुरंदर तालुक्यात प्रवेश केल्यावर सलग चार दिवसांचा प्रवास हा सोहळा पुरंदर तालुक्यातील सासवड, जेजुरी,वाल्हा, नीरा या शहरातून करीत आहे. पुरंदर तालुक्यात पालखी सोहळा आल्यानंतर प्रशासनातील प्रत्येक खात्याच्या विविध अधिकारी आणि कर्मचाºयांमध्ये उत्साहाचे वातावरण चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. सोहळ्याच्या सेवेसाठी प्रत्येक अधिकारी व कर्मचारी उत्सूक दिसत होते.

टॅग्स :PuneपुणेPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळा