लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : इमारतीवर दगड मारल्याच्या रागातून तिघा सराईतांसह टोळक्याने तरुणावर वार करून गंभीर जखमी केले. गंभीरला??????? पोलीस चौकीत नेल्याचा राग आल्याने आरोपींनी मदत करणाऱ्यावर वार करून जखमी केले. ही घटना हडपसरमधील रामटेकडी येथील प्रथमा सोसायटीसमोर २ जुलै रोजी सायंकाळी साडेसहा आणि रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली.
वानवडी पोलिसांनी सुमित ऊर्फ चिक्या बगाडे, रोहित बगाडे, अतुल खंडागळे, दत्ता बगाडे, सौरभ वाल्मीकी, रोहित खंडागळे (सर्व रा. प्रथमा सोसायटी, रामटेकडी, हडपसर), धीरज, आदित्य अशा आठ जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. रोहित बगाडे, अतुल खंडागळे, दत्ता बगाडे हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.
हडपसरमधील रामटेकडी परिसरात घडली. यश वाल्मीकी (वय १९, रा. रामटेकडी) आणि साहिल नहार अशी गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत.
फिर्यादी यश वाल्मिकी रामटेकडीत राहायला असून डीमार्टमध्ये कामाला आहे. तो कामावरुन सायंकाळी घरी जात असताना प्रथमा सोसायटीबाहेर टोळक्याने त्याला अडविले. तुला जास्त मस्ती आली आहे का, आमच्या इमारतीवर दगड का मारले, असे विचारून टोळक्याने पालघनने वार करून गंभीर जखमी केले. त्यानंतर यशला उपचार करण्यासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचा मित्र साहिल नहार हा रात्री साडेअकरा वाजता आपल्या घराजवळ असताना या टोळक्याने त्याला अडवून तू यशला पोलीस चौकीत घेऊन का गेला होता, असे म्हणून सुमित याने त्याच्या डोक्यात कोयत्याने वार केला. तो पळून घरात आला असताना हे टोळकेही घरी आले. त्यांनी घराचा दरवाजा तोडून आत शिरले. साहिल याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. पोलीस उपनिरीक्षक भूषण पोटावडे अधिक तपास करीत आहेत.