निर्माण मानसोपचार व व्यसनमुक्ती केंद्रात बुद्धजयंती विधायक विचार व्याख्यानाद्वारे साजरी करण्यात आली. या वेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या वेळी सम्यक् दृष्टी, सम्यक् संकल्प, सम्यक् समाधी, सम्यक् कर्म, सम्यक् वाचा, सम्यक् व्यायाम, सम्यक् स्मृती व सम्यक् आजीविका या अष्टांग मार्गांचे सुलभ विवेचन व सध्याच्या जागतिक वातावरणात त्याची नितांत योग्यता असल्याचे मत प्रा. प्रकाश दळवी यांनी व्यक्त केले. या वेळी व्यसनापासून मुक्त राहण्याचा निर्धार व संकल्प रुग्णमित्रांनी केला.
याप्रसंगी निर्माण संस्थेचे मुख्य मानसोपचार तज्ज्ञ तथा संचालक डॉ. भालचंद्र काळमेघ व संचालक साहेबराव दराडे यांचे मार्गदर्शन लाभले. निर्माण संस्थेत मानसोपचार, पुनर्वसन व व्यसनमुक्ती केंद्र या ठिकाणी विविध कृतिशील उपक्रम सातत्याने राबवत असतात.