पिंपरी : स्मार्ट पाणी वाटप, स्मार्ट वाहतूक, स्मार्ट सिग्नल, जीपीएस द्वारे सर्वेक्षण, स्मार्ट पर्यावरण, मोबाईल अॅपची निर्मिती केली जाणार आहे. पॅन सिटी प्रकल्पाचा डीपीआर मंजूर करण्यात आला. त्यासाठी पीएनवाय या सल्लागार संस्थेची नियुक्त केली जाणार आहे. महापालिका व पोलीस यंत्रणा यांच्यासाठी कंट्रोल अॅण्ड कमांड सेंटर तयार करण्यात येणार आहे. आगामी वर्षभरात ही कामे केली जाणार आहेत. या कामाची निविदाप्रक्रिया पूर्ण झाली असून, लवकरच त्याचे काम सुरू होईल. पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या संचालक मंडळाची चौथी बैठक सोमवारी महापालिका भवनात झाली. त्यात पॅनसिटीच्या डीपीआरला मंजूरी दिली असून पब्लिक सायकल शेअरींग, कमाडंन्ट कंट्रोल सेंटर, सोलर रूफ टॉफ, शाळांमध्ये इलर्निंग प्रकल्प राबविण्यात येणार आहे. याबाबतच्या प्रस्तांवाना संचालक मंडळाने मंजूरी दिली. या स्मार्ट सिटीच्या बैठकीस प्रधान सचिव डॉ. नितीन करीर, केंद्र सरकारच्या गृहनिर्माण विभागाचे संचालक आर. के. सिंग, महापौर नितीन काळजे, आयुक्त श्रावण हर्डीकर, सभागृह नेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड, संचालक प्रमोद कुटे, स्मार्ट सिटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी निळकंठ पोमण, अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे उपस्थित होते.तज्ञ समिती नेमणारस्मार्ट सिटीसाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश असणारा सल्लागार समिती नेमण्यात येणार असून त्यात खासदार, आमदार, कॉलेजचे संचालक, विविध सामाजिक संस्था, उद्योगांचे प्रतिनिधींचा समावेश असणार आहे. समिती नेमण्याच्या विषयाला मंजूरी देण्यात आली, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली. सौर उर्जेस प्राधान्यस्मार्ट सिटी अंतर्गत महापालिकेच्या इमारतींवर सोलर रूफ टॉप उभारण्यात येणार आहे. त्यात महापालिकेचे संततुकारामनगर येथील वायसीएम रूग्णालय, निगडीतील जलशुद्धिकरण केंद्र, कासारवाडीतील एसटीपी, पिंपळेगुरव येथील निळू फुले सभागृहाच्या इमारतींवर ही यंत्रणा उभारण्यात येणार आहे.ई- लर्निंगसाठी तीन शाळामहापालिकेच्या तीन शाळांमध्ये ई- लर्निंग प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. पायलेट प्रकल्प उभारण्यात येणार आहे. सायकल शेअरींगसाठी २७ जागांची निवड केली आहे. खासगी संस्थेची मदत घेतली जाणार असून महापालिकेची कोणतीही गुंतवणूक नसणार आहे. .................
पिंपरी-चिंचवडमध्ये पॅनसिटीचा डीपीआर मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 2:49 PM
पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या संचालक मंडळाची चौथी बैठक सोमवारी महापालिका भवनात झाली. त्यात पॅनसिटीच्या डीपीआरला मंजूरी दिली असून पब्लिक सायकल शेअरींग, कमाडंन्ट कंट्रोल सेंटर, सोलर रूफ टॉफ, शाळांमध्ये ई- लर्निंग प्रकल्प राबविण्यात येणार आहे.
ठळक मुद्देसंचालक मंडळाची बैठक : निविदा प्रक्रिया होणार सुरूपीएनवाय या सल्लागार संस्थेची नियुक्त केली जाणार