शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
2
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
3
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
4
पॅसेन्जरच्या जेवणात निघाला जिवंत उंदीर, कराव लागलं विमानाचं इमरजन्सी लॅन्डिंग; नेमकं काय घडलं?
5
मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत
6
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
7
"राजानं प्रखर टीका सहन करुन चिंतन करायला हवं"; नितीन गडकरींचे मोठं वक्तव्य
8
३ महिन्यांपासून थंडावलेले डिफेन्स कंपन्यांचे स्टॉक्स; आता जोरदार तेजी; एकात लागलं अपर सर्किट
9
नवरी जोमात, नवरा कोमात! घरातून पळाली; बॉयफ्रेंडशी केलेल्या लग्नाचे पाठवले फोटो, पती म्हणतो...
10
पितृपक्षात महालक्ष्मी गजकेसरी योग: ९ राशींना वरदान काळ, सर्वोत्तम संधी; लाभच लाभ, शुभ होईल!
11
कुमारी सैलजा भाजपमध्ये सामील होणार? मनोहर लाल यांनी दिले संकेत; म्हणाले, "वेळ आल्यावर सर्व समजेल"
12
धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड
13
डिविडेंड, व्याजाच्या पेमेंटवर SEBI चे नवे नियम; Mutual Funds साठीही गूड न्यूज
14
IND vs BAN : ...म्हणूनच जग बुमराहची कॉपी करतं; बांगलादेशच्या खेळाडूनं सांगितलं यशाचं कारण
15
भाजप मावळमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करणार; सुनील शेळकेंचा गंभीर आरोप
16
जबरदस्त कमबॅक! शतकी तोरा दाखवत पंतनं केली MS धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
17
"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी
18
Sukesh Chandrasekhar : "बेबी गर्ल! कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं..."; जॅकलिनशिवाय जगणं महाठग सुकेशसाठी अवघड
19
आधी वन हँड सिक्सर! मग चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट करताना दिसला पंत (VIDEO)
20
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात

मांजरीतील पांडवकालीन मांजराईदेवी

By admin | Published: October 06, 2016 3:30 AM

मातीतून उगवते ते धान्य हे पृथ्वीचे सर्जनाचे प्रतीक, नव्याला जन्म देणारी पोषणशक्ती घट हे जल तत्त्व जीवनदायिनी नदीजल हे समस्त जीवसृष्टीला जगविणारी शक्ती

मांजरी : मातीतून उगवते ते धान्य हे पृथ्वीचे सर्जनाचे प्रतीक, नव्याला जन्म देणारी पोषणशक्ती घट हे जल तत्त्व जीवनदायिनी नदीजल हे समस्त जीवसृष्टीला जगविणारी शक्ती, अखंङ पाजळणारा नंदादीप तेजोमय शलाका, अंधार, अशुभ नष्ट करणारी धूप-चंदनाचा सुगंध वायू आसमंत पवित्र ठेवतो आणि हे सगळे धारण करणारी मंडपी म्हणजे आकाश हे सावरण्याचे, आधाराचे व्यापून राहण्याचे प्रतीक. मांजरी गावाला व मांजराईदेवीला असाच स्त्रीशक्तीचा इतिहास आहे. दंतकथांनी पुराण श्रवणीय होते.मांजरी बुद्रुक गावातील आणि मुळा-मुठा नदीतीरी वास्तव्यास असलेल्या मांजराईदेवीबाबत श्रद्धा, भक्ती आणि जिव्हाळ्याचे नाते परिसरातील प्रत्येक माणसाने जपलेले आहे.या मांजराईदेवीची स्थापना व मंदिराच्या निर्मितीबाबत एक आख्यायिका आहे. पुरातनकाली माद्री ही हस्तिनापूरची महाराणी. तिचा पती महाराज पंडू व पुत्रांसह अज्ञातवासात असताना मुळा-मूठा नदीकाठी वास्तव्यास होती. शापित पंडूला पत्नीस्पर्श वर्ज्य होता. तो झाल्यास मृत्यू अटळ होता. पतीच्या मृत्यूस कारण म्हणून महाराणी शीलवती माद्री सती जाते व अखंड पातिव्रत्य जपते.ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेल्या या देवीच्या मंदिरात नवरात्रोत्सव दर वर्षी मोठ्या भक्तिपूर्ण वातावरणात साजरा केला जातो. मांजरी गावाच्या आबालवृद्धांचे अभिमानाचे व श्रद्धेचे स्थान आहे. अष्टौप्रहर तेवणारा नंदादीप, देवीचे मुखवटे, दागदागिने, पूजाअर्चा यांची सगळी व्यवस्था पाहणारे मंदिराचे पुजारी आपला नोकरी-व्यवसाय बघून सतत देवीच्या सेवेत असतात. देवीच्या मंदिरासमोर अखंड शिलाखंड, दीपमाळ व वृंदावन आहे. प्रत्येक मंगळवारी देवीच्या दर्शनासाठी मंदिर खुले असते. इतर दिवशी मूळ रूपात सकाळ व संध्याकाळी पूजन व आरती होते. मंदिरात पारंपरिक काकडा व भजन-कीर्तन होत असते. मुळा-मुठा नदीच्या तीरावर वसलेल्या गावाला याच देवीच्या नावावरून मांजरी नाव पडले. मांजराईदेवीची स्थापना पांडवांनी केल्यामुळे त्या काळापासूनचा इतिहास या गावाला असल्याचे सांगितले जाते. तसेच थेऊर येथील चिंतामणी व मांजरीची देवी यांचे बहीण-भावाचे नाते आहे, असे मानले जाते. तसा गणेशकोषामध्येही उल्लेख आहे. दर वर्षी नवरात्रोत्सवात सकाळ-सायंकाळी महाआरती, जागरण-गोंधळ अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन येथे केले जाते. फार पूर्वी मंदिराच्या परिसरात मुख्य रस्त्यापासून मंदिरापर्यंत व आजूबाजूच्या परिसरात चहूबाजूंनी निवडुंगाची झाडे मोठ्या प्रमाणात होती. तीन वर्षांपूर्वी या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. मंदिराच्या परिसराचे कांक्रिटीकरण करण्यात आले असून, बगिच्या फुलविण्यात आला आहे. (वार्ताहर)४पांडव अज्ञातवासात असताना प्रवासादरम्यान एका रात्री ते या ठिकाणी मुक्कामी राहिले होते. या मुक्कामात आई माद्री हिची आठवण म्हणून त्यांनी मुक्कामाच्या ठिकाणी मुळा-मुठा नदीतीरी एका रात्रीत मंदिर उभारले. संपूर्ण काळ्या पाषाणामध्ये मंदिराचे चांगले काम केलेले आहे. ४गाभाऱ्यात व सभामंडपात एक प्रकारे थंड, शांत, धीरगंभीर, पवित्र अनुभूती येते. सभामंडपातील शिलास्तंभ व खेळती हवा त्यात अधिकच भर घालते. मंदिराचे काम करीत असताना सूर्योदय झाल्याने पुढचे काम त्यांनी थांबविले. त्यामुळे कळसाचे काम अपूर्ण सोङून पांडवांनी येथून प्रस्थान केले.४माद्रीच्या नावाने उभारलेल्या या मंदिरामुळे पुढे येथील वस्तीला माद्री हे नाव पडले. नंतर त्याचा अपभ्रंश होऊन या गावाला ‘मांजरी’ असे नाव मिळाले व तेच नाव रूढ झाले.